कॉफी की ग्रीन टी... काय पिणं हृदयासोबतच आरोग्यासाठी ठरतं जास्त फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 02:57 PM2024-07-19T14:57:37+5:302024-07-19T15:21:07+5:30

ग्रीन टी की कॉफी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत जाणून घेऊया...

जगभरात हायपरटेन्शन आणि हाय ब्लड प्रेशर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हृदयरुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, फक्त भारतात तब्बल २२ कोटी लोक हायपरटेन्शन आणि हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त आहेत.

योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींनी असे आजार टाळू शकता. कॉफी आणि ग्रीन टीचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जाते. परंतु, ग्रीन टी की कॉफी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत जाणून घेऊया...

JACC (Japan Collaborative Cohort Study for Evaluation of Cancer Risk) चा अभ्यास जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट एसोसिएशनमध्ये पब्लिश झाला आहे. या अभ्यासात १८ हजार लोकांनी भाग घेतला. १२ वर्षे चाललेल्या या अभ्यासातून संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करत होते की कॉफी किंवा ग्रीन टीचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे का?

या अभ्यासात, संशोधकांना असं आढळून आलं की कॉफीमध्ये अंदाजे ९५ ते २०० mg कॅफिन आढळतं. त्याच वेळी, ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण ३५ mg आहे. याचा अर्थ ग्रीन टीच्या तुलनेत कॉफीमध्ये जवळपास तीन पट जास्त कॅफीन आढळतं.

जास्त कॅफिनमुळे ज्यांना हाय बीपीची समस्या आहे त्यांच्यासाठी कॉफीचं सेवन हानिकारक ठरू शकतं. तर ग्रीन टी ही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे.

अभ्यासानुसार, ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफोनल्स नावाचे घटक कॅफिनचे हानिकारक इफेक्ट्स बाहेर काढून टाकतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं.

हृदयासाठी फायदेशीर असण्यासोबतच ग्रीन टीचे इतरही अनेक फायदे आहेत. हे रोज प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे याशिवाय, याच्या सेवनाने मधुमेह देखील नियंत्रणात राहू शकतो.

कॉफीचेही अनेक फायदे आहेत. कॉफी एनर्जी लेव्हल बूस्ट करण्यासाठी मदत करते. मेंदूचं कार्य सुधारतं. हे हृदयासाठी देखील फायदेशीर आहे, परंतु हाय बीपीच्या बाबतीत कॉफी पिणं टाळावं.