Corona Vaccination: सर्वात BEST व्हॅक्सिन घेण्याचा नाद सोडा, जी मिळतेय ती लवकर घ्या, अन्यथा...; वैज्ञानिकांचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 03:50 PM 2021-06-19T15:50:45+5:30 2021-06-19T15:55:26+5:30
Covid 19 Vaccine: सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेवर अनेक देशांनी भर दिला आहे. यात विविध लसींचा पर्याय उपलब्ध असल्याने सर्वाधिक चांगली लस कोणती? ती घेऊ असं काहींचा पवित्रा आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सध्या अनेक लस बाजारात उपलब्ध आहेत. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, फायझ, मॉर्डना, स्पुतनिक अशा विविध लस जगभरात उपलब्ध असल्याने कोणती लस सर्वाधिक चांगली आहे? असा प्रश्न लोकांच्या मनात पडला आहे.
याबाबत मेलबर्नच्या पीटर डोहर्टी इन्स्टिट्यूट फॉर इंफेक्शन अँन्ड इम्युनिटीनं रिसर्च केला आहे. सध्या जगात उपलब्ध असणाऱ्या लसींपैकी सर्वाधिक चांगली कोणती? हे सांगणं कठीण आहे. सर्वाधिक चांगली याची नेमकी व्याख्या काय? अशी लस ज्यामुळे गंभीर आजारापासून संरक्षण मिळेल. ज्या कमी बूस्टर डोसची गरज आहे जी तुमच्या वयोगटासाठी योग्य राहील?
सध्या आपल्याकडे ज्या लस लवकर उपलब्ध होत आहेत तीच सर्वाधिक चांगली लस आहे. लोकांना त्यांच्या पसंतीची लस मिळणं, त्यांना पर्याय उपलब्ध होणं, कोणतीही वाट न पाहता हवी ती लस आपल्याला उपलब्ध होणं हे जरूरी नसेल तर सर्वाधिक चांगली लस जी उपलब्ध आहे त्यालाच म्हणता येईल.
कोणती लस सर्वाधिक चांगली आहे याचे उत्तर क्लिनिकल चाचणीतू मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जगभरातील नियामक अधिकाऱ्यांकडून लसीला देण्यात आलेली परवानगी असू शकतं. विविध लसीचा परिणाम आणि त्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.
उदाहरण द्यायचं झालं तर क्लिनिकल चाचणीत फायझर लस कोरोनाला रोखण्यासाठी ९५ टक्के प्रभावी ठरते तर एस्ट्राजेनेकाच्या लसीच्या डोस आधारे ती ६२-९० टक्क्यापर्यंत प्रभावी ठरत आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यातील चाचणी विविध स्थान आणि वेळेवर निर्धारीत आहे.
सामुहिक संक्रमणाचा दर, सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि वेगवेगळ्या व्हेरिएंटसवर प्रभाव भिन्न पाहायला मिळत आहे. लसीकरणानंतर त्याचा प्रभाव ती घेतलेल्या लोकांवर अभ्यास करून करता येऊ शकतो. यात एक लस घेतलेल्या समुदाय आणि दुसरी लस घेतलेला समुदाय यांच्यावरील प्रभावाची तुलना करता येईल.
कोविड लसीच्या प्रभावाची तुलना अशा देशामध्ये केली जाऊ शकते ज्यात एकाच लोकसंख्येत विविध लस दिल्या गेल्या आहेत. उदा. ब्रिटनच्या नव्या आकडेवारीनुसार फायझर आणि एस्ट्राजेनेका या दोन्ही लसीचा प्रभाव समान दिसून आला आहे.
या दोन्ही लसीच्या एका डोसनंतर कोविड १९ लक्षणं, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता आणि मृत्यू यापासून सरंक्षण मिळत आहे. क्लिनिकल चाचणीत प्रभावी ठरलेली लसच सर्वाधिक चांगली असेल अशी आवश्यकता नाही. तुम्हाला जी कोविड लस मिळाली आहे ती शेवटची नसेलही.
कोविड लसीकरणानंतर वेळोवेळी बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे अनेक लस मिळून एक सर्वाधिक चांगली होऊ शकते. सर्वाधिक चांगली लस घेण्याची तुमची जिद्द तर्कसंगत आहे. परंतु जी सध्या तुमच्याकडे उपलब्ध आहे तीच सर्वाधिक चांगली लस आहे. त्यामुळे कोविड १९ च्या संक्रमणापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
आता उपलब्ध असणाऱ्या सर्व लसी कोरोनापासून रुग्णांना गंभीर अवस्थेपासून संरक्षण देतात. सर्वांच्या दृष्टीकोनातून हा लाभ आवश्यक आहे. जितक्या जास्त लोकांना कोरोना लस दिली जाईल तितकं कोरोनातून सामाजिक संक्रमण होण्यापासून बचाव होईल. ज्यामुळे कोविड १९ चा प्रार्दुभाव कमी होण्यात मदत मिळेल.
जागतिक कोरोना महामारीच्या काळात व्हायरस प्रत्येक दिवशी त्याचे रुप बदलून अधिक धोकादायक बनत आहे. लसीकरणाची व्याप्ती अपूर्ण असल्याने अनेक भागात महामारीचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सर्वाधिक चांगली लस मिळेल ही पूर्ण न होऊ शकणारी इच्छा आहे. परंतु उपलब्ध असणाऱ्या लसीचा प्रत्येक डोस परिस्थिती सर्वसामान्य होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल आहे.