कोरोनाची येतेय! पण 40 वर्षांनंतरही HIV वर लस शोधता आली नाही; जाणून घ्या आव्हाने By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 01:24 PM 2020-12-01T13:24:37+5:30 2020-12-01T13:31:46+5:30
world Aids Day : कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हे वैज्ञानिकांनीच अनेकदा सांगितले आहे. यासाठी काही वर्षेही लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असेच काहीसे या एड्स बाबत झाले आहे. जागतिक एड्स दिवस आहे. जगातील महाभयंकर साथरोग कोरोनावर संशोधकांना लस शोधण्यात यश आले आहे. मात्र, एड्स या रोगाला ४० वर्षे होऊनही अद्याप लस मिळालेली नाही.
कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हे वैज्ञानिकांनीच अनेकदा सांगितले आहे. यासाठी काही वर्षेही लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असेच काहीसे या एड्स बाबत झाले आहे.
१९८० मध्ये पहिल्यांदा एड्सबाबत वैज्ञानिकांना समजले होते. एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी किंवा हा रोग झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी आजपर्यंत एकही औषध तयार झालेले नाही. हा आजार कोरोना एवढा खतरनाक नसला तरीही लैंगिक संबंधांमुळे होत असल्याने तेवढाच बदनाम आहे.
एखाद्याला एड्स झालेला असला आणि त्याची सुई किंवा अन्य तत्सम टोचलेली वस्तू जर अन्य कोणाला लागल्यास त्यालाही एड्स होण्याची शक्यता असते. शिवाय एड्स असताना शारीरीक संबंध ठेवल्याही एड्स पसरण्य़ाची शक्यता आहे. एवढा मोठा रोग असूनही यावर जगभरातील रथी महारथी संशोधकांना यावर लस शोधता आलेली नाही. एवढे असले तरीही एड्सबाबत जनजागृती आणि काळजी घेतल्याने हा रोग कमालीचा नियंत्रणात आला आहे.
1984 मध्ये पहिल्यांदा एड्सबाबत माहिती मिळाली होती. यावर अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने छातीठोकपणे दावा केला होता की, दोन वर्षांच्या आत एड्सवर औषध बनविण्यात येईल. मात्र, जंग जंग पछाडूनही शास्त्रज्ञांना काही औषध सापडले नव्हते. असे का झाले ते जाणून घ्या....
मानवी शरीरात रोगांशी लढणारी प्रतिकार शक्ती एड्स व्हायरसच्या विरोधात कामच करत नाही. हा रोग ज्याला होतो, त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होते, मात्र ती केवळ या व्हायरसच्या शरिरातील प्रसाराचा वेग कमी करते, रोखत नाही.
यामुळे एचआव्ही झालेल्या रुग्णाला बरे करणे जवळपास अशक्य आहे. एचआयव्हीला शरिरातील प्रतिकार शक्तीच काही प्रतिसाद देत नसल्याने वैज्ञानिकही या व्हायरसविरोधात ठोस असे औषध शोधू शकलेले नाहीत. कारण शरीरातील नैसर्गिक अँटीबॉडीला मदत म्हणून औषधापासून आणखी अँटीबॉडी तयार होत नाही.
एड्स हा कोरोना एवढा वेगवान रोग नाही. त्याची शरिरामध्ये पसरण्याचा वेग हा काही वर्षांचा असतो. या काळात हा व्हायरस मानसाच्या डीएनएमध्ये लपून राहतो. यामुळे या व्हायरसला शोधून नष्ट करणे खूप कठीण काम आहे. लसीच्या बाबतीतही असेच असते.
कोणतीही लस बनविण्यासाठी कमजोर झालेल्या किंवा नष्ट झालेल्या व्हायरसचा वापर केला जातो. मात्र, त्यासाठी त्या व्हायरसने इम्यून तयार केलेले असावे लागते. तसेच कोणत्याही व्हायरसच्या जिवंत रुपाचा वापर करणे खूपच धोक्याचे असते.
अधिकाधिक लसी या अशा व्हायरसपासून सुरक्षा करतात जे शरीरामध्ये श्वासोच्छवासाद्वारे किंवा गैस्ट्रो-इंटसटाइनल सिस्टमद्वारे दाखल होतात. तर एचआयव्हीचे संक्रमण गुप्तांग किंवा रक्ताद्वारे होते.
जनावरांवर व्हायरस आणि लसीची चाचणी केल्यानंतर मानसांसाठी औषध बनविले जाते. मात्र, दुर्भाग्य म्हणजे एचआयव्हीसाठी असे काहीच यश आलेले नाही.
फक्त एकच जमेची बाजू म्हणजे कोरोना एड्ससारखा डीएनएमध्ये लपत नाही. यामुळे तो शोधला जाऊ शकतो.