Corona Vaccine: कोविशिल्ड लस कोव्हॅक्सीन प्रमाणे शक्तीशाली नाही? एका क्लिकवर जाणून घ्या, नेमकं काय आहे तथ्य By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 01:10 PM 2021-05-21T13:10:32+5:30 2021-05-21T13:28:57+5:30
लशींच्या डोसमधील गॅप वाढविल्यानंतर, वाद अणखी वाढला आहे. एका लशीतील गॅप न वाढवता ती आधी प्रमाणेच घ्यायची आहे. तर दुसऱ्या लशीतील गॅप वाढवण्यात आला आहे, असे का? (Corona Vaccine Covaxin or Covishield which one is more effective vaccine controversy gap between the two doses) कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, तोच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी आधीच सावध पवित्रा घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम कमीत कमी व्हावा, यासाठी जास्तीत-जास्त लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. सध्या देशात केवळ कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोनच लशी लोकांना टोचल्या जात आहेत. मात्र, आता या दोन पैकी कोणती लस अधिक प्रभावी यावरूनच वाद विवाद होताना दिसत आहेत.
लशीच्या डोसमधील गॅपवरून वाद - लशींच्या डोसमधील गॅप वाढविल्यानंतर, वाद अणखी वाढला आहे. एका लशीतील गॅप न वाढवता ती आधी प्रमाणेच घ्यायची आहे. तर दुसऱ्या लशीतील गॅप वाढवण्यात आला आहे, असे का? असा सवाल निर्माण झाला आहे. सीरम इंस्टिट्यूटची कोरोना व्हॅक्सीन कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे.
हे अंतर का वाढविण्यात आले, त्यावर आता खुद्द ICMR कडूनच माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, डॉक्टर बलराम भार्गव म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर अधिक अंटीबॉज तयार होत नाहीत. तर कोव्हिशील्डच्या पहिल्या डोसनंतर अँटीबॉडीज चांगल्या प्रमाणावर तयार होतात.
कोव्हॅक्सिन - भारतात तयार रण्यात आलेल्या या स्वदेशी लशीसंदर्भात कंपनीकडून सांगण्यात आले आहे, की ही लस 81 टक्के प्रभावशाली आहे. ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआरने तयार केली आहे. लशीचे दोन डोस घेतल्यानंतर अंटीबाडी वाढतात.
तिसऱ्या ट्रायलचे परिणाम घोषित करताना आयसीएमआर आणि भारत बायोटेकने म्हटले होते, की सामान्य कोरोना रुग्णांवर कोव्हॅक्सिन लस 78 टक्के प्रभावशाली आहे. ही लस रुप बदलणाऱ्या कोरोना व्हायरसविरोधातही अँटीबॉडी तयार करण्याचे काम करते. कोव्हॅक्सिनच्या डोसमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
कोविशील्ड - ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाची लस भारतात कोविशिल्ड नावाने ओळखली जाते. येथे हिचे प्रोडक्शन सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII), पुणे करत आहे. भारतात नुकतेच कोविशील्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे.
या लशीसंदर्भात सांगण्यात आले आहे, की ही लस दोन डोसनंतर कोरोनाशी लढण्यात 90 टक्के प्रभावी आहे. सुरुवातीच्या संशोधनानंतर समोर आले होते, की ही लस एक डोसनंतर 80 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.
पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) म्हटले आहे, की त्यांची कोरोनालस पूर्णपणे सुरक्षित असून ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आहे.
रिसर्चमध्ये समोर आले असे तथ्य - या लशीवर आंतरराष्ट्रीय चमूने केलेल्या रिसर्चमधील डाटामध्ये समोर आले आहे, की दोन डोसदरम्यान 12 आठवड्यांचे अंतर असल्यास अधिक परिणाम होतो. अमेरिका, पेरू आणि चिली येथे करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये, चार आठवड्यांहून अधिक काळानंतर दुसरा डोस दिल्यास 79% अधिक परिणाम होतो, असे समोर आले आहे.
इतर देशांतील डाटावरून समोर आले आहे, की 6 आठवड्यानंतर दुसरा डोस दिल्यास अधिक फायदा होतो. ब्राझील, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसून आले, की दुसरा डोस 6-8 आठवड्यानंतर दिल्यास त्याचा परिणाम 59.9%, 9-11 आठवड्यांनंतर दिल्यास 63.7% आणि 12 अथवा त्याहून अधिक आठवड्यांनी दिल्यास 82.4% होतो.
पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या एका नव्या अभ्यासानुसार, ऑक्सफर्ड/एस्ट्राजेनेका अथवा फायझर/बायोएनटेक लशींचा एक डोसदेखील कोविड-19 चा प्रसार अर्ध्यावर आणते.