Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 09:37 PM 2021-04-22T21:37:15+5:30 2021-04-22T21:49:55+5:30
कोरोना व्हारसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी जगभरात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र, ग्लासगोतील एका महिलेसाठी ही लस त्रासदायक ठरली आहे. (Women legs erupt in agonising blood filled blisters after getting astra zeneca covid vaccine) कोरोना व्हारसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी जगभरात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र, ग्लासगोतील एका महिलेसाठी ही लस त्रासदायक ठरली आहे. या लशीमुळे या महिलेला प्रचंड वेदना होत आहेत. या महिलेने दावा केला आहे, की अॅस्ट्रोजेनेका लस घेतल्यानंतर या महिलेच्या पायावर रक्ताने भरलेले फोड (blood filled blisters) आले आहेत. यामुळे तिला प्रचंड वेदना होत आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ग्लासगोतील सारा बुकमॅनने म्हटले आहे, की मार्च महिन्याच्या मध्यात अॅस्ट्रोजेनेका कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना फ्लू सारखी लक्षणं दिसून आली. हा एक सर्वसामान्य साइडइफेक्ट होता. मात्र, एका आठवड्यानंतर त्यांच्या पायाला मुंग्या आल्यासारखे जाणवू लागले. यानंतर, गुडघ्याभोवती लाल पुरळ दिसून आले. (सांकेतिक छायाचित्र)
हे पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रकृतीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला बोलावले. मात्र, यानंतर दुपारपर्यंत त्यांच्या त्वचेवर रक्ताचे फोड आले.
यानंतर संबंधित महिलेला तत्काळ क्वीन एलिझाबेथ युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. (सांकेतिक छायाचित्र)
डॉक्टरांना आपले पाय कापावेतर लागणार नाही ना? या शंकेने संबंधित महिला घाबरलेली आहे. मात्र, अद्याप डॉक्टरांनी त्यांना असे काहीही सांगितलेले नाही.
बूकमॅनने रुग्णालयात 16 दिवस घालवले आहेत आणि अद्यापही त्यांच्या हातावर, पायावर, आणि चेहऱ्यावर व्रण दिसत आहेत. त्यांना डोक्टरांनी सुट्टी दिली असली तरीही त्या सध्या व्हिलचअरवरच आहेत. कारण पायाला पट्ट्या असल्याने आणि तळव्यांनाही फोड आले असल्याने त्या चालू शकत नाहीत. (सांकेतिक छायाचित्र)
इग्लंडच्या त्वचा रोज तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या महिलेला लस घेतल्यानंतर, तिच्या अत्यंत दुर्मिळ साइडइफेक्टचा सामना करावा लागला. (सांकेतिक छायाचित्र)
यानंतर बुकमॅन यांनी, लस घेण्यासाठी इंग्लंडच्या लोकांना आवाहन केले आहे. तसेच जागरूकता वाढविण्यासाठी त्यांनी त्यांचे अनुभवही सांगायला हवेत, असे म्हटले आहे. (सांकेतिक छायाचित्र)
मात्र, त्यांनी असेही सांगितले आहे, की आता डॉक्टरांनी त्यांना साइडइफेक्ट्स पाहता लशीचा दुसरा डोस घेऊ नये, असे सांगितले आहे.