Corona virus : Corona will be difficult to control when this situation will happen research MYB
Corona virus : 'असं' झालं तर कोरोनाला आटोक्यात आणणं होईल कठीण, रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 10:37 AM2020-03-20T10:37:38+5:302020-03-20T11:07:50+5:30Join usJoin usNext सध्या भारतात कोरोना व्हायरस पसरण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील अध्ययनातून एक मोठा खुलासा झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून आलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या आरोग्यासंबंधी आपत्तीजनक परिस्थीती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसं वाढतं प्रमाण लक्षात घेता जगभरात अनेक रिसर्च करण्यात येत आहेत. तुम्हाला सगळ्याना कल्पना असेल तर सर्दी, खोकला, ताप यांसारख्या लक्षणांनी हा आजाार पसरण्याची सुरूवात होते. यापासून बचाव करण्यासाठी रुग्णाला निरिक्षणाखाली ठेवणं, तसंच सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांवर दुर्लक्ष न करणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. अमेरिकेतील मॅसाचुसेट्समध्ये झालेल्या कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनने त्रासलेल्या रुग्णांवर रिसर्च करण्यात आला. यात असं दिसून आलं की एकूण ८२ केसेस अशा समोर आल्या आहेत . ज्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसली नव्हती तरी सुद्धा व्हायरसचं संक्रमण त्यांना झालं होतं. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC)च्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरस हा लक्षणं दिसण्याच्या आधीपासूनच पसरत असतो. अमेरिकेत २० वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांवर संशोधन करण्यात आले होते. त्यात असं दिसून आलं की अनेकदा लक्षणं दिसत नसल्यामुळे पिडीत व्यक्तीला या आजाराबद्दल कल्पना सुद्धा नसते. चीनमध्येसह जगभरात पसरणारा कोरोना व्हायरस हा लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांमुळे अधिक पसरत गेला. ऐसिम्प्टमैटिक इन्फेक्शन या कोरोनाच्या महामारीला वाढवत असतं. त्यामुळेच त्याला आटोक्यात आणणं कठीण होऊन बसतं. पण जगभरात लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या वाढली तर कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढू शकतं. त्यासाठी अलिकडेच अमेरिकेने कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस शोधण्यात आली आहे. यातून कोरोनापासून बचाव करण्यास मदत होईल. म्हणून खबरदारी बाळगायला हवी. मास्कचा आणि सॅनिटाजरचा वापर करणं गरजेचं आहे. शिवाय सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणाचा त्रास जास्त जाणवत असल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे. अमेरिकेतील रिसर्चकर्त्यांचे याबाबत संशोधन अजूनही सुरू आहे.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth