Corona virus : How to increase immunity for prevent corona virus
Corona virus : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आधी रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कशी ते जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:21 PM2020-03-05T12:21:04+5:302020-03-05T13:34:12+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरस हा झपाट्याने जगभरात पसरताना दिसून येत आहे. भारतात सध्या कोरोनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. काही सुरक्षा घेतल्यास कोरोनापासून आपला बचाव करता येऊ शकतो. कोरोनाची लक्षणं तुम्हाला माहीतच असतील शिंकण्यातून किंवा खोकण्यातून तसंच हवेमार्फत हा आजार पसरत जातो. तुम्हाला या आजारापासून वाचायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची रोगप्रतिकारकशक्ती स्ट्रॉग असणं. कारण जर तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो. तसंच कोरोना व्हायरसच्या संक्रमाणापासून पण वाचता येतं. चला तर मग जाणून घेऊया. कशी वाढवायची रोगप्रतिकारकशक्ती. कच्चा लसूण खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणा एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात. नियमित दह्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सोबतच याने पचनक्रियाची सुरळीत राहण्यात मदत होते. म्हणजे दही खाल्ल्याने तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. सोबतच यात एँटी-मायक्राबिअल गुणही असतात. त्यामुळे रोज ओट्स खाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे. संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी चं सेवन करणं फार फायदेशीर ठरतं. लिंबू, आवळा, संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेली फळं खावीत. हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी मोसमी फळे, दूध यांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुम्हाला शरीरासाठी पोषक तत्व नियमित मिळतील. या पोषक तत्वांमुळेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासही मदत मिळते. आपल्या शरीराची इम्यून सिस्टीम आपला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करते. यावरून हे स्पष्ट होतं की, इम्यून शक्ती कमजोर झाली तर आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. अशात फार गरजेचं असतं की, सतत रोगप्रतिकारक शक्ती मजूबत ठेवणे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःच आरोग्य चांगलं ठेवू शकता. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फक्त खाणं पिणंच नाही तर रोजच्या जीवनात आपण करत असलेल्या चुकांकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. व्हायरल इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करू नका.आल्याचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते. तुम्ही आल्याचा रस किंवा भाज्या आणि चहामध्ये आहारात समावेश करू शकता. अनेक लोक बाहेरचे हिरवे ज्यूस पित असतात. पण त्यात केमिकल्स असू शकतात. तुम्हाला असं वाटत असतं की हे ज्यूस शरीरासाठी चांगले असतात. पण बाहेरचे ज्यूस तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीसाठी मारक ठरत असतात. अशा पदार्थाचा आहार घेण्यापेक्षा नैसर्गिक पालक किंवा पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. बदामाचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.चार ते पाच बदाम पाण्यात भिजवून तुम्ही खाऊ शकता. हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते. पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते. तुम्ही कांदा, टॉमॅटो, लसूण, पालक हे पदार्थ एकत्र करून व्हेजिटेबल सुप तयार करून पिऊ शकता.त्यामुळे नैसर्गिकरित्या तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. सगळयात महत्वाचं असतं ते म्हणजे झोप पूर्ण होणं. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आराम पूर्ण होईपर्यंत झोपा. जेव्हा तुम्हाला फ्रेश वाटेल तेव्हाच उठा. कारण झोप पूर्ण झाली नाही तर शरीरातील रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यासाठी मोबाईलचा वापर झोपण्याच्या वेळेत करू नका. आपले हात स्वच्छ धुवा अनेक लोक हात न धुत अनेक पदार्थ खातात.त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तुमची किडनी, लिव्हर यांवर परिणाम सुद्धा होऊ शकतो. प्राणायम केल्यानेसुद्धा रोगप्रतिकारकशक्ती व्यवस्थित राहते. त्यासाठी वेळ मिळेल तसं व्यायाम करायला विसरू नका. कारण तुमचं शरीर हेल्दी राहण्यासाठी व्यायाम करणं महत्वाचं आहे. ताण-तणाव घेतल्यामुळे सुद्धा रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असते. त्यासाठी आपल्या मित्रांना वेळ देऊन किंवा कुटुंबियांशी बोलून आपला ताण घालवण्याचा प्रयत्न करा. तुमचा एखादा आवडता छंद जोपासा त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील.टॅग्स :कोरोनाआरोग्यcorona virusHealth