Corona virus : know the benefits drinking of turmeric with milk myb
Corona virus : हळदीच्या दुधाचे सेवन करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा आणि आजारांचं टेंशन विसरा..... By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:20 PM2020-03-22T15:20:57+5:302020-03-22T15:52:40+5:30Join usJoin usNext सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे या महाभयंकर आजारापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची औषध न घेता हळदीच्या दुधाचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हळदीच्या दुधाच्या सेवनाचे फायदे. दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जास्त जाणवतो अशा लोकांनी हळदीच्या दुधाचं सेवन करणं गरजेचं आहे. त्वचेसाठी हळदीचे दूध अतिशय लाभदायी ठरते. हे दूध पिल्याने तुमची त्वचा उजळते. हळदीमध्ये एटिऑक्सिडन्ट गुण असल्याने त्वचेशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत मिळते. हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनरल्स तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. सर्दी, खोकला आणि घशात होत असलेल्या खवखवीसाठी हळदीचं दूध उत्तम ठरत असतं. रोज रात्री झोपण्याआधी हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीर चांगले राहते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजचं जीवन जगत असताना जीवनवशैलीतील बदलांमुळे अनेक लहान मोठ्या आजारांचाच सामना करावा लागतो. या आजारांशी लढण्यासाठी तुम्ही जर हळदीच्या दुधाचे सेवन केले तर फरक दिसून येईल. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे सतत आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल. हळदीच्या दुधाचं मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने नियमित आणि प्रमाणात रोज सेवन केलं तर मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. टॅग्स :हेल्थ टिप्समहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealth TipsCoronavirus in Maharashtra