Corona virus : Know the causes of corona virus myb
Corona virus : कोरोना व्हायरस सगळीकडे कसा पसरतो? जाणून घ्या A to Z कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 09:55 AM2020-03-04T09:55:12+5:302020-03-04T10:15:36+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरस भारतात सध्या झपाट्याने पसरत आहे. चीन आणि इतर देशांमध्येच नाही तर भारतात सुद्धा कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. या धोकादायक व्हायरसमुळे आतापर्यंत सुमारे 3 हजार लोकांचा बळी गेला असून सुमारे 90 हजार लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत देशातील एकूण पाच रुग्णांना कोरोना व्हायरस झाल्याचं आढळून आलं आहे. लोकांच्या मनात कोरोना व्हायरस कसा पसरतो कोरोना व्हायरस या बाबत अनेक शंका आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोना नेमका कसा पसरतो याबाबत सांगणार आहोत. कोरोना व्हायरस इन्फेक्शनच्या माध्यामातून पसरत असतो. जर एखादी व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमीत असेल तर त्या व्यक्तीच्या संपर्कात येत असलेल्या व्यक्तीला सुद्धा कोरोना व्हायरस होतो. खोकण्यामुळे आणि शिंकण्यामुळे कोरोना पसरतो. जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल तर आपल्या तोंडाला माक्स लावून झाकण्याचा प्रयत्न करा. आजारी व्यक्तीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कोरोना व्हायरसने पिडित असलेला एखादा व्यक्ती तर तुमच्या आजूबाजूला शिंकत किंवा खोकत असेल तर त्याच्या श्वासांतून येत असलेले व्हायरस हवेत पसरून तुम्ही जेव्हा श्वास घ्यास तेव्हा कोरोना व्हायरस होण्याची शक्यता असते. जर एखादा टेबल किंवा सामानाला इंफेक्टेड व्यक्तीने हात लावला असेल आणि तुम्ही सुद्धा त्यात वस्तुला वारंवार हात लावत असाल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता असते. काही लोक आजारी नसताना सुद्धा कोरोना व्हायरसचे शिकार झालेले असू शकतात. कारण असे लोकं कोरोना व्हायरसच्या लक्षणांना ओळखू शकलेले नसतात. म्हणून शिंका किंवा खोकण्यातून त्यांना हा आजार होऊ शकतो. मास खाल्याने कोरोना पसरतो का? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर याबद्दल अधिक माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. असं म्हटलं जातं की आजार प्राण्यांपासून आला आहे. म्हणून चीनमध्ये मासं न खाण्याचा सल्ला दिला जात आहे. भारतात सुद्धा कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास न खाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी मासाहार करू नका.टॅग्स :कोरोनाआरोग्यcorona virusHealth