Covishield Side Effects: कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 05:51 PM 2021-09-11T17:51:38+5:30 2021-09-11T18:03:21+5:30
सुरुवातीला, असा रिपोर्ट आला होता, की लसीमुळे न्यूरॉलॉजिकल कॉम्पलीकेशन्सबरोबरच ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डरचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, लस वापरासाठी मंजुरी मिळाली आहे आणि ती सुरक्षित असल्याचेही मानली जात आहे. (Covishield vaccine side effects) कोरोना लस आल्यापासूनच, तिच्या दुष्परिणामांसंदर्भात सातत्याने चर्चा होत आहे. यांपैकी, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका लसीचे दुष्परिणाम आरोग्य तज्ञांची चिंता वाढवत आहेत. (Corona virus vaccine Covishield vaccine side effects)
सुरुवातीला, असा रिपोर्ट आला होता, की लसीमुळे न्यूरॉलॉजिकल कॉम्पलीकेशन्सबरोबरच ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डरचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, लस वापरासाठी मंजुरी मिळाली आहे आणि ती सुरक्षित असल्याचेही मानली जात आहे.
प्रत्येक व्यक्तीवर वेग-वेगळा परिणाम - कोविशील्ड लसीच्या वापरानंतर लोकांत ताप आणि फ्लूसारखी लक्षणे दिसून आली आहेत. पोस्ट लसीकरणाशी संबंधित या प्रकरणांमध्ये, कोविशील्ड लसीचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम होतो, असेही दिसून आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतेच कोविशील्ड लसीचे 4 दुष्परिणाम दिसून आले आहेत. यांकडे लोकांनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या, ही लस लोकांना दिली जात असतानाच, तिच्या दुष्परिणामांचीही नोंद घेतली जात आहे.
हात-पाय दुखणे - कोविशील्ड लस घेतल्यानंतर तुम्हाचे हात-पाय दुखू शकतात. साधारणपणे असे बहुतांश लसी घेतल्यानंतर होते. मात्र, हे दुखणे कमी असेल, तर ते सामान्य दुष्परिणाम असू शकतात. मात्र, त्रास अधिक होत असले, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. बर्याच लोकांचे पाय आणि सांधे दोन्ही दुखतात आणि त्यांना थकवाही जाणवतो. तसेच, काही लोकांचा फक्त एकच पाय दुकखतो, जर एकच पाय दुखत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
व्हायरल इन्फ्लूएन्झासारखी लक्षणे - लस घेतल्यानंतर आपल्याला फ्लूसारखी लक्षणेही जाणवू शकतात. युरोपियन वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटले आहे, की लस घेतल्यानंतर, तुम्हाला व्हायरल इन्फ्लूएन्झाप्रमाणे थंडी वाजून येणे, ताप येणे अथवा अंगदुखीसारखी लक्षणे जाणवू शकतात. असे प्रत्येकासोबतच होत नाही. मात्र, हा लसीचा साइड इफेक्ट असल्याने यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
यामुळे, जर आपल्याला ताप, मसल्स पेन, नाक वाहणे आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर, ते लसीचे साइड इफेक्ट्स असू शकतात. यापूर्वीही, वाहणारे नाक हा एक फार कमी दिसणारा दुष्परिणाम आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा लोकांमध्ये लस घेतल्यानंतर तो दिसून येतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे.
मळमळ होणे... - मळमळणे, पेटात क्रॅम्प येणे ही लक्षणेही आपल्याला लस घेतल्यानंतर दिसू शकतात. ही डाइजेस्टिव लक्षणं यापूर्वीही दुसरी लस घेतलेल्या लोकांत दुसून आली आहेत. मात्र, कोविशील्ड- एस्ट्राझेनेका लस टोचल्यांमध्येही आरोग्य तज्ज्ञांना ही लक्षणं दिसून आली आहेत. लस घेतल्यानंतर आपल्याला उल्टीही होऊ शकते. हे लक्षण प्रामुख्याने पहिला डोस घेतल्यानंतर दुसून येते.
भूक न लागणे - कोविशील्ड लस घेतल्यानंतर बऱ्याच लोकांची भूकच मंदावल्याचे आणि ते व्यवस्थित पणे खाऊ शकत नसल्याचे दिसून आले आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका लस मिळाल्यानंतर लोकांना साधारणपणे दोन दिवस काहीही खाण्याची इच्छा झाली नाही. कोविड - 19 प्रमाणेच, फ्लू सारख्या आजारांमध्येही भूक न लागण्यासारखी लक्षण दिसतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे दुष्परिणाम काही लोकांमध्येच दिसून येतात. लसीकरणानंतर एक किंवा दोन दिवसांनी आपल्याला ही लक्षणे दिसू शकतात आणि अधिक गंभीर झाले नाही, तर अपोआप ठीकही होतात.