CoronaVirus : 10 things you should not missed before entering private quarantine centre
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की करा 'ही' १० कामं By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 09:22 AM2020-06-28T09:22:57+5:302020-06-28T09:41:31+5:30Join usJoin usNext कोरोनाची माहामारी प्रचंड वेगाने वाढत आहे. भारतातील रुग्णांची संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचत आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर लोकांना आयसोलेट किंवा क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाची लढाई जिंकण्याासठी क्वारंटाईन झाल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला १० गोष्टी सांगणार आहोत.त्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात. जेणेकरून संक्रमण झालं असल्यास तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागणार नाही. आवडते पुस्तक: क्वारंटाईन सेंटरमध्ये तुम्ही आपलं आवडतं पुस्तक घेऊन जाऊ शकता. त्यामुळे मन गुतूंन राहण्यास मदत होईल. तुमचा वेळ चांगला जाईल. हे सामान असायलाच हवे: गरम पाण्याची बाटली, गुळवेलाचा रस, व्यवनप्राश, बिस्कीटं, कमीतकमी २ जोडी कपडे, साबण, टुथब्रश, याशिवाय लवकर खराब न होणारी फळं तुम्ही सोबत ठेवू शकता. टिश्यूपेपर, चमचा ठेवायला विसरू नका. तसंच लहान आकाराचे स्टिमरही तुम्ही सोबत ठेवू शकता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास स्टिमर फायदेशीर ठरेल. आईडी आणि कोविड रिपोर्ट: रुग्णालयात भरती होताना आपली महत्वाची कागदपत्रंसोबत असायलाच हवीत. म्हणजेच आधार कार्ड, ऑफिसचे आयकार्ड, कोविड 19 रिपोर्ट सोबत असायला हवा. अनेकदा तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते. इंश्योरंस: कोणत्याही खासगी किंवा चांगल्या सुविधेचा लाभ घेण्याासाठी सगळ्यात आधी आपली इंश्योरंस पॉलिसी तपासून पाहा. आपातकालीन स्थितीत पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला इंश्योरंस फायदेशीर ठरू शकतो. कारण कोरोनाची लस विकसीत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. बेड्सची उपलब्धता: काही रुग्णालयात तुलनेने सोयीसुविधा कमी असतात. त्यामुळे आपल्या मनाची तयारी करून ठेवा. त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीची संपर्क करून उपलब्धतेची माहिती मिळवा. रुग्णवाहिकेचा वापर टाळा: जर तुम्हाला कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं दिसत असतील रुग्णवाहिकेचा वापर टाळून खासगा वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचा. घर डिसइंफेक्टंट करून घ्या: तुमचा रिपोर्ट पॉझिजिव्ह आल्यास घरी इन्फेक्शन पसरण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे घर आधी स्वच्छ करून घ्या. कारण कुटुंबाला १४ दिवस घरी क्वारंटाईन राहण्याची आवश्यकता भासू शकते. कुटुंबाची काळजी घ्या: क्वारंटाईन सेंटरमध्ये तुम्ही कुटुंबापासून दूर असाल तरी काळजी घेऊ शकता. त्यासाठी ऑक्सीमीटर, बीपी मशीन थर्मामीटर अशा वस्तू घरात असू द्या. घरच्यांना या वस्तूंच्या वापराबाबत योग्य माहिती द्या. घरातील कोणत्याही व्यक्तीला लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घ्या. कोणतंही औषध किंवा व्हिटामीन देण्याआधी एक किंवा दोन दिवस वाट पाहा. आपातकालीन स्थितीत चाचणी करून घ्या. लॅपटॉप: कोणतेही महत्वाचे मेल पाठवण्यासाठी, कार्यक्रम पाहण्यासाठी, मित्रांसह वेळ घालवण्यासाठी तुम्हाला क्वारंटाईन सेंटरमध्ये लॅपटॉप फायदेशीर ठरू शकतो. ऑनलाइन कंटेंट: कोरोनाच्या काळात तुमचा वेळ जितका लवकर आणि चांगला जाईल तेव्ढंच फायदेशीर ठरेल. त्यासाठी क्वारटांईन सेंटरमध्ये जाण्याआधी तुमच्या आवडच्या चित्रपटांची लिस्ट तयार करा. ओटीटी प्रोडक्ट्स, नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओ यांमुळे तुमचा वेळ चांगला जाईल. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्यcorona virusHealth TipsHealth