CoronaVirus : 6 most searched questions about coronavirus on google
CoronaVirus : २०२० मध्ये कोरोनाबाबत सगळ्यात जास्त लोकांनी शोधली 'या' ६ प्रश्नांची उत्तरं By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 11:49 AM2020-12-25T11:49:01+5:302020-12-25T12:09:57+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाबाबत सकारात्मक माहिती समोर आली होती. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होताना दिसून येत होती. पण आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने मान वर काढल्यानं जगभरात चिंताजनक वातावरण पसरलं आहे. या रोगाच्या भीतीचा अंदाज यावरून काढला जाऊ शकतो की २०२० मध्ये कोरोना व्हायरस हा गूगलवर सर्वाधिक शोधला जाणारा शब्द होता. गूगलच्या वार्षिक शोध अहवालानुसार, कोरोना व्हायरसवरील इंटरनेटवर सर्वात जास्त शोधले जाणारे ६ प्रश्न आहेत. १) कोरोना व्हायरस कधीपर्यंत शरीरारत राहतो? संक्रमण झाल्यानंतर इन्क्यूबेशनचा वेळ जवळपास २ ते ५ दिवसांपर्यंत असतो. दरम्यान काही लोकांना कोरोनातून बरं होण्यास जास्त कालावधी लागतो. जवळपास ७ ते १४ दिवसांपर्यंतचा कालावधी कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर येण्यास लागतो. २) कोरोनाची लक्षणं काय आहेत? लक्षणे पूर्णपणे दिसायला अनेकदा 2 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ताप, खोकला, सर्दी सारखी सामान्य लक्षणं दिसून येतात. त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणं, चव न समजणं, वास घेता न येणं अशी लक्षणं दिसून येतात. ३) कोणत्याही वस्तूवर कितीवेळ जीवंत राहू शकतो कोरोना? कोरोना व्हायरसचा श्वासांच्या माध्यमातून पसरतो. हवेतील संक्रमित ड्रॉपलेट्स कोरोना व्हायरस पसरण्याचे कारण ठरू शकतात. कोविड १९ त्वचेवर दीर्घकाळ जीवंत राहू शकतो. म्हणून सतत हात सॅनिटाईज करण्याची सवय असायला हवी. ४) कोरोना व्हायरस कसा पसरतो? सामान्यत: कोरोनाचा प्रसार लोकांच्या संपर्कात आल्यामुळे होतो (सहा फूटांपेक्षा कमी), तसेच जेव्हा एखाद्या संक्रमित व्यक्तीस खोकला, शिंका येणे किंवा त्यांच्या स्पर्श केलेल्या पृष्ठभागास स्पर्श केला जातो. तेव्हा त्यामुळे ती व्यक्ती संक्रमित होऊ शकते. ५) तुम्ही कधीपर्यंत कोरोना संक्रमित असता? कोरोनातून संपूर्ण बरं व्हायला जवळपास १४ दिवसांचा कालावधी लागतो. १० दिवसांनंतरचा कालावधी संक्रमित मानला जात नाही. जर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला ताप, खोकला किंवा लक्षणांमधे हळूहळू घट आढळली तर तो निरोगी घोषित केला जातो. 24 तासांत केलेल्या दोन वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास त्याच चाचणीद्वारे स्पष्ट केले जाते. ६) हवेतून होतो का कोरोनाचा प्रसार? ऑक्टोबर महिन्यात कोरोनावरील रिसर्चने सर्वांनी आश्चर्यचकित केले आणि अधिकृतपणे याची पुष्टी केली की कोविड-१९ कोरोना व्हायरसचा प्रसार हवेतून होतो. हवेमध्ये कोरोना पसरल्याचा अर्थ असा होता की कोरोना एखाद्या पृष्ठभागावर जमा होऊ शकतो आणि जास्त काळ हवेत राहिल्यामुळे अधिक संसर्गजन्य होऊ शकतो. Read in Englishटॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याHealth TipsHealthcorona virusCoronaVirus Positive News