CoronaVirus : Aiims director dr guleria coronavirus peak covid 19 health worker
कोरोनाचे तीव्र परिणाम अजूनही दिसलेले नाहीत; कम्युनिटी ट्रांसफरचा धोका अधिक By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 11:57 AM2020-06-07T11:57:05+5:302020-06-07T12:19:48+5:30Join usJoin usNext कोरोनाचं विषाणूंचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना (AIIMS) मधील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणाचे खरे परिणाम अजूनही दिसून आलेले नाहीत. वेगवेगळ्या राज्यात कोरोनाच्या संक्रमणाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एम्समधील वरिष्ठ डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कम्यूनिटी ट्रांस्फरबाबत सांगितले की, दिल्ली आणि मुंबई कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. अशा ठिकाणी लोकल ट्रांसमिशन होत असल्याचे आपण म्हणू शकतो. संपूर्ण देशभरात अशीच स्थिती दिसून येत आहे. १० ते १२ ठिकाणं अशी आहेत जिथे लोकल ट्रान्समिशन होऊ शकतं. एम्समध्ये अशा ७० ते ८० केसेस दिसून आल्या आहेत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. आता काही प्रमाणात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. डॉक्टर गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन उघडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी वाढत आहे. अशात लोकांनी सोशल डिस्टेंसिग आणि मास्क लावणं गरजेचं आहे. कोरोना रुग्णांसाठी दिवसेंदिवस व्हेंटिलेटर्स आणि बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे प्लॅनिंग चेंज करायला हवी. ज्या लोकांमध्ये संक्रमणाची लक्षणं दिसून येत आहेत. त्यांनी घरी राहून स्वतःला क्वारंटाईन करायला हवं. कारण कमी तीव्रतेची लक्षणं दिसत असलेले रुग्ण स्वतःहूनच बरे होत आहेत. त्यांना ट्रिटमेंटची आवश्यकता अधिक प्रमाणात नसते. असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रुग्णालयात भारतातील वेगवेगळ्या भागातील लोक कोरोनाचे उपचार घेत आहेत. आरोग्यविभागात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास सांगितले की, अनेक लोक कोविड एरिया तसंच नॉन कोविड एरियातून जास्त प्रमाणात येत आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान काळजी घेण्याची आवश्यकता आहे. इतर देशांच्या तुलनेत युरोपातील देशात मृतांची संख्या जास्त आहे. भारतातील मृत्यूदर कमी आहे त्यामुळे काळजी घेतल्यास तसंच नियमांचे पालन केल्यास विषाणूंचे संक्रमण तीव्र होण्यापासून रोखता येऊ शकतं. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्यcorona virusHealth