Coronavirus and dementia america dementia associated genes also threaten covid19 myb
'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:12 PM2020-05-28T12:12:16+5:302020-05-28T12:38:10+5:30Join usJoin usNext कोरोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनावर लस आणि औषध शोधण्याासाठी प्रयत्न केले जात आहेत. अलिकडे कोरोना विषाणूंशी निगडीत नवनवीन गोष्टी संशोधनातून स्पष्ट होत आहेत. या दरम्यान करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं की, डिमेंशिया (Coronavirus and Dementia) असलेल्या जीन्सना कोरोना विषांणूंच्या संक्रमणाचा धोका जास्त असतो. या जीवघेण्या विषाणूचा धोका त्या लोकांमध्ये जास्त असतो. ज्यांना डिमेंशियाशी जोडलेले आजार असतात. या संशोधनात मोठ्या प्रमाणावर लोकांना सहभागी करून करण्यात आलं होतं. या संशोधनातून कोरोना विषाणूंच्या उपचारांसाठी नवीन मार्ग शोधला जाऊ शकतो. डिमेंशियानेग्रस्त असलेली व्यक्ती विचार करण्याच्या क्षमतेसोबतच, आपली स्मरणशक्ती सुद्धा गमावून बसतो. याशिवाय रुग्ण आपली विचार करण्याची क्षमता गमावून बसल्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. हे संशोधन जर्नल ऑफ जेरोंटोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. पाच लाख लोकांवर हे संशोधन करण्यात आलं होतं. कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याचा धोका त्या लोकांना जास्त असतो. जे लोक एपीओई या ई4ई4 (Gene Linked Dementia ) चे वाहक असतात. ब्रिटेनच्या युनिव्हरसिटी ऑफ एक्सेंटर मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा रिसर्च तब्बल पाच लाख लोकांवर करण्यात आला होता. त्यात असं दिसून आलं की कोरोनाचे संक्रमित असेलेल्या प्रत्येक ३६व्या व्यक्तीमध्ये हे जीन्स होते. या जीन्सचे वाहक असलेल्यांना कोरोना संक्रमणाचा धोका दुप्पट : संशोधकांनी सांगितले की, या जीन्समुळे अल्जाईमर या आजाराचा धोका १४ टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका सुद्धा वाढतो. त्याचप्रमाणे डिमेंशियाने पिडित असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका तीन पटीने जास्त असतो. (image credit- technologynetworks.com)टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्याHealthcorona virus