CoronaVirus : Benefits with moderna coronavirus vaccine mrna 1273-94 percent effective
खुशखबर! कोरोनाला नष्ट करण्याासाठी प्रभावी ठरणार mRNA-1273 लस; जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 11:53 AM2020-11-17T11:53:17+5:302020-11-17T12:04:59+5:30Join usJoin usNext अमेरिकन कंपनी मॉडर्नाने सोमवारी दावा केल्यानुसार कंपनीने तयार केलेली (mRNA-1273) कोरोनाची लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. याआधीही अमेरिकन कंपनी फायजरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस ९० टक्के परिणामकारक ठरली होती. मॉडर्नाची लस इतर लसींच्या तुलनेत प्रभावी ठरल्याचे सांगितले जात आहे. आज आम्ही तुम्हाला मॉडर्नाची लस कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी का परिणामकारक ठरते. याबाबत सांगणार आहोत. ही लस तयार करण्यासाठी नवीन तंत्राचा वापर: मॉडर्नाची लस नवीन टेक्निकवर आधारित आहे. लसीतील एमआरएनए टेक्निकमुळे माणसाच्या शरीरातील पेशी व्हायरस प्रोटीन्स बनवण्यासाठी प्रेरित होतात. मॉडर्ना लसीची साठवण सोपी: मॉडर्ना कंपनीने क्लिनिकल ट्रायलच्या अंतरिम डेटाच्या आधारावर दिलेल्या माहितीनुसार ही लस ९४.५ टक्के परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. या लसीला ३० दिवसांपर्यंत सामान्य फ्रिजच्या तापमानात ठेवलं जाऊ शकतं. 6 महिन्यांपर्यंत या लसीची साठवण करण्यासाठी २० डिग्री तापमानाची आवश्यकता असते. फायजरची लस फक्त पाच दिवसांपर्यंत सामान्य फ्रिजच्या तापमानात राहू शकते. ही लस दीर्घकाळापर्यंत टिकवण्यासाठी तसंच एका ठिकाणाहून इतर ठिकाणी नेण्यासाठी मायनस ७० डिग्री तापमानाची आवश्यकता असते. यामुळे मॉडर्नाची लसीचे वितरण सोपे होऊ शकते. लस दिल्यानंतरही दिसून येणारे साईड इफेक्ट्स हे सौम्य स्वरूपातील असतात. मॉर्डनाच्या लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या एकूण ९५ रुग्णांच्या विश्लेषणातून दिसून आलं की, ११ लोक कोरोनाने गंभीर स्वरूपात आजारी होते. या सगळ्यात रुग्णांना लसीऐवजी प्लेसबो देण्यात आले होते. मॉडर्ना कंपनी अमेरिकन सरकारच्या ऑपरेशन वार्ड स्पीड प्रोग्रामचा हिस्सा आहे. मॉर्डना कंपनी या वर्षी ३ कोटी डोसचा पुरवठा अमेरिकेला करू शकते. कंपनी २०२१ मध्ये अमेरिका आणि जगभरातील अन्य भागात लसीचे ५० कोटी ते १ अब्ज डोजचे उत्पादन करण्याची आशा करत आहे. इतर लसींपेक्षा अधिक प्रभावी : फायजर कंपनीची लस 90 टक्के प्रभावी असल्याची नोंद झाली आहे. रशियन लस स्पुटनिक-व्ही चा कमी प्रमाणात डेटा त्यांनी प्रकाशित केला आहे, म्हणून रशियाच्या लसीचबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बहुतांश लसी तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीला ५० ते ६० टक्के प्रभावी ठरतात. मात्र फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींचे निष्कर्ष अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आहेत. मात्र कोरोना लसीचं वितरण सुरू करण्यापूर्वी अधिक माहिती उपलब्ध होणं गरजेचं आहे. कोरोना लसीच्या सुरक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळाल्यानंतरच नियामकांकडून लसींना मंजुरी मिळते. नियामकांनी लवकर परवानगी दिल्यास डिसेंबरपासून अमेरिकेत दोन्ही लसींचा आपत्कालीन वापर सुरू होईल.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सcorona virusHealth Tips