CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:19 PM 2021-08-07T17:19:38+5:30 2021-08-07T17:33:11+5:30
Fenofibrate : फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे. कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध फेनोफायब्रेटने (Fenofibrate) कोरोना व्हायरसचा धोका 70 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो, असा दावा इंग्लंडमधील बर्मिंघम विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका संशोधनावरून केला आहे. (CoronaVirus British researchers says oral drug fenofibrate may cut sars cov 2 infection by 70 percent)
संशोधकांनी दावा केला आहे, की या औषधात असलेले फेनोफायब्रिक अॅसीड कोविडचे संक्रमण कमी करते. सुरुवातीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्येही हे सिद्ध झाले आहे.
फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे.
विशेष म्हणजे, जगभरातील बहुतेक औषध प्राधिकरणांनी कोलेस्टेरॉलच्या रुग्णांवर फेनोफायब्रेट औषधाच्या वापरास मान्यताही दिलेली आहे.
संशोधक एलिझा व्हिसेन्झी यांनी म्हटले आहे, संशोधनाचे परिणाम दर्शवतात, की फेनोफायब्रेटमध्ये कोरोना संसर्ग गंभीर होण्यापासून रोखण्याची क्षमता आहे. तसेच हे विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यातही मदत करते.
एवढेच नाही, तर सर्व क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतर हे औषध ज्यांना लस दिली जाऊ शकत नाही, अशा लोकांनाही दिली जाऊ शकते. जसे, लहान मले आणि हायपर इम्यून डिसऑडर्सचा सामना करत असलेले रुग्ण, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या मूळ स्ट्रेनवर केला प्रयोग - वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी प्रयोगशाळेत कोरोनाच्या मूळ स्ट्रेनने संक्रमित झालेल्या पेशींवर फेनोफायब्रेट औषधाचा परिणाम पाहिला. यात, संसर्गाचा धोका 70 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.
सध्या, अमेरिका आणि इस्रायलमधील रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर या औषधाची ट्रायल सुरू आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की हे औषध कोरोनाच्या अल्फा, बीटा स्ट्रॅन्सवरही प्रभावी आहे.
डेल्टा स्ट्रेनवर संशोधन सुरू - संशोधकांनी म्हटले आहे, की कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन अत्यंत घातक आहे. या ट्रेनवर फेनोफायब्रेट औषध किती प्रभावी आहे, यासंदर्भात संशोधन केले जात आहे. लवकरच निकाल जाहीर केले जातील.