coronavirus can infect the brain and replicate tiny neuronal balls study suggests
कोरोनाचा फुफ्फुसांपेक्षा मेंदूला जास्त फटका; ३ दिवसात १० पटीने वाढते विषाणूंची संख्या By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:00 AM2020-06-17T10:00:19+5:302020-06-17T10:21:17+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसची माहामारी संपूर्ण जगभरात अजूनही वेगाने पसरत आहे. या माहामारीची विशिष्ट लक्षणं लोकांमध्ये दिसत नसून वेगवेगळया स्वरुपाची लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येतात. जगभरातील अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या संशोधनातून कोरोनाचे नवीन स्वरूप समोर येत आहेत. एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस फक्त फुफ्फुसांवरच नाही तर मेंदूवरही हल्ला करतो. हा व्हायरस डोक्याच्या पेशींना मोठ्या प्रमाणात संक्रमित करतो. कोरोना व्हायरसचे रुग्ण संपूर्ण जगभरात वाढत असाताना या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा व्हायरस मेंदूच्या पेशींना अनेक पटीने संक्रमित करत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस मेंदूच्या न्यूरॉन्सपर्यंत पोहोचला तर तीन दिवसांच्या आत आपली संख्या दहा पटीने वाढू शकतो. हा अभ्यास जॉन्स हॉपकिंस यूनिवर्सिटीतील तज्ज्ञांनी केला आहे. जॉन्स हॉपकिंस ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रोफेसर डॉक्टर थॉमस यांनी Financial Times ला दिलेल्या माहितीनुसार आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव कोरोनाच्या संक्रमणामुळे खराब होऊ शकतो ही बाब लक्षात यायला हवी. संशोधकांनी या व्हायरसचा संबंध 'मिनी ब्रेन' शी सुद्धा जोडला आहे. व्हायरस ACE2 प्रोटीनच्या माध्यमातून मिनी ब्रेनमध्ये न्युट्रॉन्सना संक्रमित करतो. त्यातून कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो. संशोधकांनी या व्हायरसचा संबंध 'मिनी ब्रेन' शी सुद्धा जोडला आहे. व्हायरस ACE2 प्रोटीनच्या माध्यमातून मिनी ब्रेनमध्ये न्युट्रॉन्सना संक्रमित करतो. त्यातून कोरोना व्हायरसचा शरीरात प्रवेश होतो. त्यानंतर कोरोना व्हायरस मेंदूच्या पेशींच्या आत जाऊन वेगाने वाढू लागतो. तीन दिवसांनंतर दहा टक्क्यांनी संक्रमणाचा वेग वाढतो. संशोधकांनी सांगितले की व्हायरसचा प्रसार हा न्यूरोलॉजिकल आजारांचे कारण ठरू शकतो. किंवा शरीराच्या इतर भागांवरही व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत जातो. कोरोना व्हायरसचा माणसांच्या शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो. याबाबत संशोधन सुरू आहे. एप्रिलमध्ये वुहानमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार २१४ पैकी एक तृतीयांश रुग्णांना न्यूरोलॉजिकल समस्यांचा सामना करावा लागला होता. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सcorona virusHealth Tips