Coronavirus china factory farming deadlier pathogen risk new pandemic
धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:10 PM2020-07-20T14:10:08+5:302020-07-20T15:31:20+5:30Join usJoin usNext जगभरातील प्रमुख वैज्ञांनिकांनी धोक्याची सुचना दिली आहे की चीनमध्ये कोरोना व्हायरसपेक्षा घातक स्वरुपाच्या व्हायरसचा प्रसार होत आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस माणसांमध्येही पसरू शकतो. वर्ल्ड एनिमल प्रोटेक्शनसह कार्यरत असलेल्या वैज्ञानिक ब्लॅसजॅक यांनी सांगितले की, आक्रमक पद्धतीने पशुपालन केले जात आहे. त्यामुळे एंटीबायोटीक रेजिस्टेंससोबत कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू जन्म घेऊ शकतो. Express.co.uk च्या रिपोर्टनुसार सिंगापूरमध्ये राहत असलेल्या ब्लॅसजॅक यांनी सांगितले की. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या २ नवीन प्रकारांसोबत झुंज दिली जात आहे. या व्यतिरिक्त एवियन इंफ्लूएंजा व्हायरसमुळे स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढलं आहे. या व्हायरसमध्ये माणसांच्या श्वसन संस्थेवर आक्रमण करण्याची क्षमता असते. केट यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षात चीनमधील पशूपालनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. परंपरागत पशुपालन न करता आक्रमक पशुपालन केलं जात आहे. ज्यात नियमांचे पालन केलं जात नाही. खूप कमी जागेत मोठ्या संख्येने प्राण्यांना ठेवलं जातं. अशा वातावरणात व्हायरसचं म्यूटेशन जास्त वेगाने होऊ शकतं. म्हणजेच व्हायरस आपली सख्या जलद गतीने वाढवू शकतो. त्या परिसरातून बाहेर येत असलेल्या कचऱ्यापासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. चीनमध्ये डुक्करांचे मासांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. चिकनच्या उत्पादनात चीन जगभरातून दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान चीनच्या मासळी आणि प्राण्यांच्या बाजारातून कोरोना हा जीवघेणा विषाणू पसरल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी केला आहे. (Image credit- The New Yorker)टॅग्स :कोरोना वायरस बातम्याचीनआरोग्यcorona viruschinaHealth