खुशखबर! पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा

By manali.bagul | Published: September 25, 2020 11:37 AM2020-09-25T11:37:11+5:302020-09-25T11:54:10+5:30

गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं जगभरात कहर केला आहे. संपूर्ण जगभरात कोरोना संक्रमणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान चीनी कंपनीने कोरोना व्हायरसची लस २०२१ पर्यंत अमेरिका आणि इतर देशांमध्ये वितरणासाठी तयार असेल असा दावा केला आहे.

सिनोवॅक कंपनीचे सीईओ यिन वेइदॉन्ग यांनी संयुक्त राष्ट्र अमेरिकेत कोरोनाची लस विक्रीस उतरवण्यासाठी FDAकडे परवानगी मागितली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणी सध्या सुरू आहे. यिन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी स्वतः प्रायोगिक तत्त्वावर ही लसी घेऊन पाहिली आहे.

यिन यांनी सांगितले की, सुरूवातील ही चीन आणि वुहानसाठी तयार करण्यात आली होती. त्यानंतर जून जुलैमध्ये ही रणनिती बदलण्यात आली असून आता संपूर्ण जगभरात कोरोनाची लस पुरवण्याचा विचार केला जात आहे.

जगाला लवकरात लवकर लस मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. अमेरिका, युरोपीय संघ, जपान आणि ऑस्टेलियामध्ये कडक नियमांमुळे चीनी लसींची विक्री पूर्णपणे रोखण्यात आली आहे. दरम्यान यिन यांना अशी आशा आहे की, या नियमांमध्ये बदल केल्यास लवकरत लवकर सगळ्यांना लस उपलब्ध करून देता येऊ शकते.

सिनोवॅक बायोटेकने लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या असून ज्या शहरातून कोरोना व्हायरस पसरला त्या ठिकाणी वुहान इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स ने सिनोफार्म (Sinopharm) नावाने लस तयार केली आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर ही लस लॉन्च करण्यासाठी ३ वैद्यकिय परिक्षणांना सुरूवात काही महिन्यापूर्वी करण्यात आली होती.

कोरोना व्हायरस पसरल्यानंतर काही महिन्यांनी सिनोवॅक कंपनीकडून अब्जावधी लसीच्या डोसचे उत्पादन करण्यासाठी तयारी करण्यात आली होती.

या कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१ च्या फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत लसीचे अब्जावधी डोसचे उत्पादन करणं शक्य असेल.

अमेरिकेसह इतर देशांमध्ये सिनोवॅक कंपनीच्या लसीचे वितरण २०२१ च्या सुरूवातीपर्यंत सुरू होऊ शकते. असं मत चीनी कंपनी सिनोवॅक कंपनीच्या तज्ज्ञांचे आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल अशी शक्यता अनेक देशांनी तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान चीनी कंपनीच्या या दाव्यानं अनेकांना आशेचा किरण दाखवला आहे.

Read in English