CoronaVirus : Chinese epidemiologist coronavirus first wave not over
'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 09:44 AM2020-07-01T09:44:16+5:302020-07-01T10:06:07+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. चीनमधील माहामारी प्रमुख तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस दीर्घकाळापर्यंत माणसांसोबत राहू शकतो. अचानक कोरोना विषाणू नष्ट होऊ शकत नाही. चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे माहामारी रोग प्रमुख जुनयू यांनी कोरोना व्हायरसची पहिला लाट अजून संपलेली नाही. असेही म्हटले आहे. जुनयू यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरसं आपलं स्वरुप बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील तीन आठवड्यांपासून चीनच्या बिजिंगमध्ये कोरोनाने कहर केला आहे. चीनच्या एन्जिन काऊंटीमध्ये जवळपास ५ लाख लोकांना वुहानप्रमाणेच लॉकडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहे. आता चीनमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट सुद्धा येऊ शकते. माध्यांमांशी बोलताना जुनयू त्यांनी सांगितले की, कोरोनाची पहिली लाट अजूनही आटोक्यात आलेली नाही. जागतिक स्तरावर कोरोनाची माहामारी वाढत असून आता जोखिम वाढलेली आहे. अमेरिका, ब्राजिल आणि भारतात कोरोनाचे स्वरुप अधिक व्यापक होत आहे. WHOच्या प्रमुखांनी ही माहामारी जागतीक स्तरावर वाढत असल्याचे याआधीही सांगितले होते. दरम्यान कोरोनाच्या माहामारीचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २० हजारांपेक्षा जास्त आहे. भारतात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांचा वाढता आकडा ही बाब चिंताजनक आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सचीनआंतरराष्ट्रीयcorona virusHealth TipschinaInternational