CoronaVirus : Corona virus attacks five main parts of bodies apart from lungs myb
कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे फक्त फुप्फुसचं नाही तर रक्तवाहिन्यांवर 'असा' होतो गंभीर परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:24 PM2020-04-22T16:24:58+5:302020-04-22T16:43:24+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर शरीरातील पेशींवर कसा परिणाम होतो. याबाबत आम्ही सांगणार आहोत. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शरीरातील श्वसनप्रणाली निष्क्रीय होत असते. त्यासोबत इतर अंतर्गत अवयवांवर कसा परिणाम होतो. याबाबत द लँसेट यात एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. यात रिसर्चकर्त्यांनी असा दावा केला आहे की कोरोना व्हायरस शरीरातील रक्तवाहिन्यांना आणि रक्ताच्या पेशींना पूर्णपणे खराब करून अवयवांवर परिणाम करत असतो. फुप्फुसांनंतर रक्तवाहिन्यावर कोरोना व्हायरस अटॅक करतो. या व्हायरसचं संक्रमण निमोनियापेक्षा जास्त घातक आहे. कारण हा व्हायरस पेशीचे सुरक्षा कवच असलेल्या एंडोथिलियम या आवरणापर्यंत जाऊन अटॅक करू शकतो. त्यामुळे रोगप्रतिकराकशक्ती कमी होते. त्यानंतर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत होणारा रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. रक्तपुरवठा संथ गतीने होतो. परिणामी किडनी, आतड्यांची समस्या अधिकच वाढत जाते. हायपरटेंशन, हाय ब्लडप्रेशर, डायबिटीस आणि लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांना या आजाराचं संक्रमण जलद गतीने होण्याची शक्यता असते. कारण या व्हायरसने एंडोथिलियम या पेशींच्या कवचाला कमकूवत बनवलेलं असतं. आरोग्यतज्ञ रुचित्जका यांनी सांगितले की मी आत्तापर्यंत अशा तीन केसेस पाहिल्या आहेत. ज्यात कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्या या व्हायरसने संपूर्ण भरलेल्या होत्या. त्यामुळे शरीरातील अवयवांवर नकारात्मक परिणाम दिसून येत होता. त्यातील ७१ वर्षीय रुग्णाला हायपरटेंशनची समस्या होती.कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर शरीरातील विविध भागांनी आपलं कार्य पूर्णपणे थांबवलं. त्यानंतर काही दिवसातच या व्यक्तीला मृत्यू झाला. भारतात सुद्धा कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तज्ञांच्यामते या व्हायरसची चेन तोडल्यानंतर संक्रमणाचं प्रमाण कमी होऊ शकतं. टॅग्स :हेल्थ टिप्सकोरोना वायरस बातम्याHealth Tipscorona virus