Coronavirus drug cipla launches ciplenza medicine for corona in august with avra laboratories
खुशखबर! कोरोनाचं 'हे' औषध ऑगस्टमध्ये येणार, किंमत आणि कुठे उपलब्ध होणार, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 03:24 PM2020-07-28T15:24:11+5:302020-07-28T15:40:14+5:30Join usJoin usNext दरम्यान ग्लेमार्क कंपनी फेविपिरावीर हे कोरोनाचं औषध तयार करत असून या औषधाचे नाव फॅबिफ्लू ठेवण्यात आले आहे. या औषधांच्या एका टॅबलेटची किंमत ४० रुपये आहे. देशातील प्रसिद्ध कंपनी सिप्ला कोरोनाचे औषध ऑगस्ट महिन्यात लॉन्च करणार आहे. हे औषध तयार करण्यासाठी सिप्ला कंपनीने भारतातील भागिदारांची सुद्धा निवड केली आहे. हे औषध बाजारातील अन्य औषधांच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त असणार आहे. आज आम्ही तुम्हाला या औषधाबाबत अधिक माहिती देणार आहोत. कोरोनाच्या या औषधाचे नाव सिप्लेंजा आहे. या औषधाची निर्मीती हैदराबादमधील एवरा लॅबोरेटरिज आणि सिप्ला प्रायव्हेड लिमिटेड या कंपन्यांकडून केली जाणार आहे. एवरा लॅबोरेटरीजला निर्मीतीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. एवरा लॅबोरेटरीज एपीआय औषध तयार करून सिप्ला कंपनीला पाठवेल त्यानंतर सिप्ला कंपनी सिप्लेंजा हे औषध लॉन्च करणार आहे. एपीआय म्हणजेच कोणत्याही औषधाचा कच्चा माला आधी तयार केला जातो. गेल्या अनेक दशकांपासून एवरा लॅबोरेटरीज औषधांवर रिसर्च करतआहे. पद्मभूषण डॉ. एवी रामा राव हे या कंपनीचे निर्माते आहेत. १९९० मध्ये यांच्यामुळेच एंटी एड्स औषध तयार करण्यास यश आले होते. या औषधाने लाखो लोकांचा जीव वाचवला आहे. कोरोनाचे औषध सिप्लेंजा जेनेरिक औषध आहे. हे औषध तयार करण्यासाठी खूप कमी खर्च लागतो. त्यामुळे कमी किमतीत हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. या औषधांच्या एका टॅबलेटची किंमत ६८ रुपये आहे. भारतातच तयार होत असल्यामुळे हे औषध सहज उपलब्ध होऊ शकते. दरम्यान ग्लेमार्क कंपनी फेविपिरावीर हे कोरोनाचं औषध तयार करत असून या औषधाचे नाव फॅबिफ्लू ठेवण्यात आले आहे. या औषधांच्या एका टॅबलेटची किंमत ४० रुपये आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याभारतcorona virusCoronaVirus Positive NewsIndia