आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:56 PM 2020-08-06T12:56:26+5:30 2020-08-06T13:26:21+5:30
देशासह जगभरात कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण कोरोना संक्रमणातून बरे होऊन घरी परततं आहेत. आतापर्यंत कोरोनाची कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. भारतात अनेक कंपन्यांनी कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी औषध लॉन्च केले आहे. ग्लेनमार्क, हेट्रो आणि सन फार्मा या कंपन्यांनंतर आता फार्मा कंपनी लुपिने बुधवारी 'कोविहाल्ट' नावाचे औषध लॉन्च केलं आहे.
इतर औषधांच्या तुलनेत या औषधाने कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे. मागील अनेक दिवसात कोरोना रुग्णाचे उपचार करण्यासाठी फेविपीर या औषधाचा वापर करण्यात येत होता. मंगळवारी सन फार्मा कंपनीने फेपिराविर फ्लूगार्ड या नावाने औषध लॉन्च केले. बुधवारी लुपिन कंपनीनं कोविहॉल्ट ब्रँण्ड नावाने बाजारात औषध उतरवलं आहे. हे औषध कोरोनाच्या सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल.
फार्मा कंपनी लुपिनं दिलेल्या माहितीनुसार फेविपिरावीरला DCGI कडून आपातकालीन स्थितीत या औषधाच्या वापरासाठी परवानी मिळाली आहे.
कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध २०० मिलिग्रामच्या १० गोळ्यांच्या स्ट्रीपच्या स्वरुपात उपलब्ध होईल. त्यातील प्रत्येक गोळीची किंमत ४९ रुपये असणार आहे.
लुपिन (आईआरएफ)चे अध्यक्ष राजीव सिब्बल यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगानं पसरत असलेला हा रोग नियंत्रण आणण्यसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
दरम्यान सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनी मंगळवारी फ्लूगार्ड ही टॅबलेट लॉन्च केली आहे. भारतीय बाजारात या टॅबलेटची किंमत ३५ रुपये इतकी आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ ची सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना ही औषधं दिली जाणार आहेत. हे औषध फेविपिराविरचे वर्जन आहे. फेविपरिविर हे एक मात्र असं औषध आहे.ज्या औषधाला भारतात एंटी व्हायरल ट्रिटमेंटसाठी कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे.
फ्लूगार्ड टॅबलेटमध्ये २०० एमजीचा डोस आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.