coronavirus enters human body with the help of protein
CoronaVirus News: धोका वाढला! कोरोना विषाणूनं शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधला By कुणाल गवाणकर | Published: October 27, 2020 09:39 AM2020-10-27T09:39:37+5:302020-10-27T09:43:41+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना रुग्णांची संख्या ८० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत ७१ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे. देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असताना आता कोरोनाबद्दलच्या एका संशोधनानं सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. कोरोनाचा विषाणू एका प्रोटीनच्या मदतीनं शरीरात प्रवेश करत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. सायन्स जर्नलमध्ये याबद्दलचा तपशील प्रसिद्ध झाला आहे. कोरोना विषाणूच्या आकार लक्षात घेतल्यास त्याची बाहेरील बाजूंना टोकदार काटे असतात. या काट्यांवर एक विशेष प्रकारचं प्रोटीन असतं. कोरोनाच्या बाहेरील बाजूस असणारं प्रोटीन मानवी शरीरात असलेल्या कोशिकांमधील प्रोटीन एसीई-२ च्या संपर्कात येतात. कोरोना विषाणू मानवी कोशिकांच्या आत शिरतो. त्यानंतर विषाणूंची संख्या वाढते. हळूहळू विषाणू संपूर्ण शरीरात पसरून कब्जा करतो. संशोधकांनी याबद्दल दोन संशोधनं प्रसिद्ध केली. या दरम्यान मानवी कोशिकांमध्ये न्युरोपिलिन-१ नावाचं प्रोटिन आढळून आलं. हे प्रोटीन कोरोना विषाणूला सकारात्मक प्रतिसाद देतं. इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी न्युरोपिलिन-१ नावाचं प्रोटीन कोरोना विषाणूला मदत करत असल्याचा शोध लावला आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus