Coronavirus : कोरोना व्हायरस इम्यून सिस्टीमला कन्फ्यूज करतो आणि सुरू होतं जीवन-मृत्यूचं 'युद्ध'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:57 AM2020-04-21T10:57:54+5:302020-04-21T11:03:52+5:30

अशा केसेना सायटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम असं म्हटलं जातं. एखाद्या रूग्णाच्या इम्यून सिस्टीमला आजार, बॅक्टेरिया किंवा व्हायरसकडून कन्फ्यूज केलं जातं.

जेव्हाही कुणी आजारी पडतं तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या इम्यून सिस्टीमवर विश्वास असतो की, ही सिस्टीम त्यांना वाचवेल. म्हणजे शरीरातील अशी सेना जी बाहेरील बॅक्टेरिया, आजार आणि व्हायरससोबत लढते. पण जर शरीरातील या सेनेला कन्फ्यूज केलं आणि ते बाहेरील शत्रूशी लढण्यासोबतच आपल्या शरीरालाच नुकसान पोहोचवू लागले तर? कोरोना व्हायरसबाबतही अशाच केस समोर येत आहेत.

अशा केसेना सायटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम असं म्हटलं जातं. एखाद्या रूग्णाच्या इम्यून सिस्टीमला आजार, बॅक्टेरिया किंवा व्हायरसकडून कन्फ्यूज केलं जातं. तेव्हा शरीरात साइटोकाइन प्रोटीनचं वादळ येतं. हे वादळ बाहेरील शत्रूंसोबतच आपल्या शरीरातील चांगल्या कोशिकांना सुद्धा मारू लागतं.

सामान्यपणे सायटोकाइन शरीरात असलेलं ते इम्यून प्रोटीन असतं जे बाहेरील आजारांशी लढतं. पण कोरोनाच्या बाबतीत ते गडबड करत आहे. बर्मिंघम येथील अलाबामा युनिव्हर्सिटीचे डॉ.रॅंडी क्रॉन म्हणाले की, साइटोकाइन्स एक प्रतिरोधक प्रोटीन आहे, जे आपल्या शरीरातून संक्रमण आणि कॅन्सरला पळवण्यास मदत करतं. पण जेव्हा हे प्रोटीन अनियंत्रित होतं. तेव्हा व्यक्ती गंभीर रूपाने आजारी होऊ शकतो किंवा व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोलनुसार, अमेरिकेत जेवढे लोक कोरोना व्हायरसने मारले गेले आहेत, त्यातील 27 टक्के लोकांच्या मृत्यूचं कारण सायटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम होतं. पण सायटोकाइनआधी वयोवृद्धांमध्ये इतरही काही आजार आहेत की नाही हे बघणंही गरजेचं आहे.

65 ते 84 वर्षापर्यंतच्या दगावलेल्या लोकांमध्ये 3 ते 11 टक्के सायटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम बघायला मिळाले. तर 55 ते 64 वयोगटातील लोकांमध्ये 1 ते 3 टक्केच लोक याने मारले गेले. 20 ते 54 वयोगटातील लोकांमध्ये सायटोकाइन स्टॉर्म 1 टक्क्यापेक्षा कमी आढळून आला.

डॉ. रॅंडी क्रॉन यांनी सांगितले की, जर चीनबाबत सांगायचं तर 80 टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीये. पण जे 20 टक्के लोक कोरोनावरील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांना हे माहीत नाही की, त्यांच्या शरीरात किती प्रमाणात सायटोकाइनचा हल्ला होत आहे किंवा तो किती वाढणार आहे.

डॉ. क्रॉन यांनी सांगितले की, आपल्या शरीरात दोन प्रकारचे इम्यून सिस्टीम असतात. पहिला ते जे जन्मजात म्हणजे इन्नेट इम्यून सिस्टीम आणि दुसरं म्हणजे अॅक्टिव इम्यून सिस्टीम जे हळूहळू विकसित होतं. हे लसीकरण आणि औषधांमुळे विकसित होतं.

जन्मजात इम्यून सिस्टीम आपल्या शरीराच्या त्वचा, म्यूकस मेंब्रेन इत्यादी भागात तयार होतं. त्यासोबत जुळलेल्या असतात फॅमोसाइट्स, अॅंटी-मायक्रोबिअल प्रोटीन्स आणि हल्ला करणाऱ्या कोशिका ज्या शिंका, खोकला आणि सर्दीपासून बचाव करतात. त्यामुळे सर्दी झाल्यावर आपलं नाक लाल होतं. हेच आपल्या नाकात सुरू असलेलं आपल्या इम्यून सिस्टीमचं युद्ध असतं.

अॅक्टिव इम्यून सिस्टीम हे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीची दुसरी सुरक्षा लाइन आहे. यात अशा कोशिका असतात ज्या गंभीर स्वरूपाचे आजार, बॅक्टेरिया आणि व्हायरस आल्यावर हल्ला करतात. या सिस्टीममधील कमांडो कोशिका केवळ शत्रूवर हल्ला करतात. त्या आपल्या शरीरातील निरोगी किंवा स्वास्थ्य कोशिकांना स्पर्शही करू शकत नाहीत.

कोरोना व्हायरस कोविड-19 आपल्या शरीरातील कोशिकांचा राहण्यासाठी, त्यांना आजारी करण्यासाठी आणि शेवटी त्यांना खाऊन नवीन व्हायरस निर्माण करण्यासाठी वापर करत आहे. कोरोना व्हायरस आपल्या शरीरात त्याच्यासाठी सुरक्षित कोशिका शोधतो, त्यांना खातो आणि नवीन व्हायरस निर्माण करतो. त्यानंतर तो शरीरात पसरतो.

कोविड-19 ला आपल्या फुप्फुसातील कोशिका हल्ला करण्यासाठी सर्वात उपयुक्त वाटल्या. कारण या कोशिका शरीरातील इम्यून सिस्टीमला थोड्या वेळाने रिस्पॉन्स करतो. जसे की, कोविड-19 आपल्या इम्यून सिस्टीमपासून लपून फुप्फुसाच्या कोशिकांमध्ये जातो. इथूनच सुरू होतं शरीरात जीवन आणि मृत्यूचं युद्ध.

कोविड-19 सोबत लढण्यासाठी येतात टी सेल्स. या टी सेल्स सक्रिय झाल्यावर सायटोकाइन रिलीज करू लागतात. यामुळे आणखी टी सेल्स तयार होऊ लागतात आणि ते आणखी सायटोकाइन रिलीज करू लागतात. म्हणजे कोविड-19सोबत लढण्यासाठी टी सेल्सची सेना तयार होत जाते.

टी सेल्सचा एक प्रकार - सायटोटॉक्सिक टी सेल्सही म्हणजे हा तो सैनिक आहे जो कोविड-19 आणि त्याने संक्रमित कोशिकांना शोधून मारतो. याने कोविड-19 आणकी कोशिका खाऊन जास्त व्हायरस तयार करू शकत नाही.

इथेच कोविड-19 सायटोटॉक्सिक टी सेल्सला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न सुरू करतो. कारण आपल्या शरीरात जेव्हा कोरोना व्हयरससोबत सायटोटॉक्सिक टील सेल्स लढाई करत असतात, त्याचवेळी एक वेगळ्या प्रकारचं रसायन निघत राहतं. जे सायटोटॉक्सिक टी सेल्सना हे सांगतं की, आता बस करा. शरीरातील शत्रू निष्क्रिय झाले आहेत.

पण कोविड-19 शरीरातून निघणाऱ्या या रसायनाचं प्रमाण कमी-जास्त करतो. याने सायटोटॉक्सिक टी सेल्स कन्फ्यूज होतं. अशा स्थितीत तो त्याचं रूप आणखी विशाल करतो. कोरोना व्हायरस आणि त्याने संक्रमित कोशिकांना मारण्यासोबतच चांगल्या कोशिकांनाही मारू लागतं. (Image Credit : www.chronobiology.com)

डॉ. रॅंड क्रॉन यांनी सांगितले की, चीनमधे मरण पावलेल्या अनेक रूग्णांमध्ये शेवटच्या वेळी सेप्टिक शॉक, ब्लीडिंग आणि क्लॉटिंगची समस्या आली होती. याचं कारण सायटोकाइन स्टॉर्म सिंड्रोम हे होतं. याकारणाने एक्यूट सेस्पिरेटी डिस्ट्रेस सिंड्रोम, निमोनिया, मल्टी ऑर्गन फेल्यूअर इत्यादी समस्या होऊ लागतात आणि रूग्ण दगावला जातो.