कोरोना वॅक्सीन घेण्याआधी चुकूनही करू नका 'हे' काम, तज्ज्ञांनी आणि WHO ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:53 AM2021-07-01T10:53:51+5:302021-07-01T11:00:33+5:30

Corona Vaccine : हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितलं की, पेन किलर्स केवळ वॅक्सीन घेतल्यावरच घ्याव्या. पेन किलर्स वेदना आणि सूज कमी करण्याच्या कामात येतात.

कोरोनापासून बचावाचा एकमेव उपाय म्हणजे वॅक्सीन घेणं हा आहे. मात्र, काही लोक घाबरून वॅक्सीन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. वॅक्सीनमुळे होणारे साइड इफेक्ट्स सामान्य आहेत. पण काही लोक हे साइड इफेक्ट्स होऊ नये म्हणून पेन किलर खाऊन वॅक्सीन घेत आहेत. हेल्थ एक्सपर्टनी लोकांना वॅक्सीन घेण्याआधी कोणत्याही प्रकारचं औषध घेण्यास मनाई केली आहे.

हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितलं की, पेन किलर्स केवळ वॅक्सीन घेतल्यावरच घ्याव्या. पेन किलर्स वेदना आणि सूज कमी करण्याच्या कामात येतात. यातील जास्तीत जास्त औषधे नॉन स्टेरायडल अॅँटी-इन्फ्लेमेटरी असतात. ज्यात वेदना कमी करणारे केमिकल्स असतात. यात सर्वात सामान्य औषध पॅरासिटामोल आहे.

या पेन किलर्स नियमितपणे घेणं योग्य नाही. अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, पेन किलर्सचा जास्त काळ सतत वापर केला तर हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, वॅक्सीन घेण्याआधी अशाप्रकारची औषधे घेतल्यास वॅक्सीनच्या क्षमतेवर परिणाम होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत इशारा दिला आहे.

वॅक्सीन घेण्याआधी वेदना कमी करणारी औषधे घेतली तर वॅक्सीन प्रति इम्यून रिस्पॉन्स कमी होतो. जर तुम्ही वॅक्सीन घेत असाल तर केवळ साइड इफेक्ट्सपासून वाचण्यासाठी अशाप्रकारची औषधे घेऊ नका. वॅक्सीनच्या ही औषधे घेतल्यास नुकसानही होऊ शकतं. कारण वॅक्सीनचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम होतो.

रिसर्चनुसार, ही औषधे इम्यून सिस्टमच्या कामात अडचण निर्माण करतात. वॅक्सीनपासून शरीराचं इम्यून सिस्टीम अॅंटीबॉडी तयार करतं. ज्यामुळे शरीरात थोडी सूज येणं सामान्य आहे. याच इन्फ्लेमेटरी रिअॅक्शन्सना साइड इफेक्ट म्हणून ओळखलं जातं. वॅक्सीनच्या आधी पेन किलर्स घेतल्यास इम्यून सिस्टमवर परिणाम होतो आणि ते ठीकपणे काम करू शकत नाही.

उंदरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, काही वेदना कमी करणारी अॅंटी-इन्फ्लामेट्री औषधे इम्यून रिस्पॉन्समध्ये अडचण निर्माण करतात आणि यामुळे अॅंटीबॉडी कमी प्रमाणात तयार होतात. हा रिसर्च जर्नल ऑफ वायरोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

तसेच हे गरजेचं नाही की, प्रत्येक व्यक्तीमध्ये वॅक्सीनचे साइड इफेक्ट्स दिसतील. पण काही लोकांमध्ये हे साइड इफेक्ट्स इथके जास्त दिसतात की, पेन किलरनेही काही फायदा होत नाही. त्यामुळे अशावेळी साइड इफेक्ट्सपासून वाचण्यासाठी पेन किलर्सवर विश्वास ठेवणं योग्य नाही.

वॅक्सीन घेतल्यानंतर हात दुखणे, ताप येणे, थंड लागणे आणि कमजोरी येणे हे सामान्य साइड इफेक्ट्स आहेत. ही लक्षणे २ ते ३ दिवसात आपोआप दूर होतात. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट साइड इफेक्टच्या बचावासाठी वेदना कमी करणारी औषधे न घेण्याचा सल्ला देतात.

जर तुम्हाला आधीच काही आजार असेल आणि तुम्ही नियमितपणे त्याची औषधे घेत असाल तर वॅक्सीन घेण्यासाठी ती औषधे घेणं सोडू नका. वॅक्सीनवेळी औषधांसंबंधी कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करा. कोणतंही औषध स्वत:हून घेऊ नका किंवा घेणं बंद करू नका.

जर तुम्ही वॅक्सीनच्या साइड इफेक्ट्सला घाबरत असाल किंवा साइड इफेक्ट्स जास्त होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. वॅक्सीन लावण्याच्या एक दिवसआधी चांगली झोप घ्या, भरपूर पाणी प्या, चांगला आहार घ्या आणि आराम करा.