चिंता वाढली! मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पुरेसं नाही; 'असा' करावा लागणार कोरोनापासून बचाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 10:34 AM 2020-06-04T10:34:59+5:30 2020-06-04T10:55:36+5:30
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सतत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. असा सल्ला सर्वत्र दिला जात आहे. पण लेसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसपासून बचावासाठी फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पुरेसं नाही. हा रिपोर्ट १६ देशांमधील १७० अभ्यासांवर आधारीत प्रकाशित करण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार सोशल डिस्टेंसिंग व्हायरसचा धोका ३ टक्के कमी करत असून एक मीटरचं अंतर ठेवल्यास २.६ टक्के व्हायरसचा धोका कमी होतो. दोन मीटर अंतर ठेवल्यास इन्फेक्शनचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.
या अभ्यासात दिसून आलं की, मास्क वापरल्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका ३ टक्क्यांनी कमी होतो. डोळ्यांची सुरक्षा केल्यास धोका ५.५ टक्क्यांनी कमी होतो. चेहरा झाकणं किंवा सोशल डिस्टेंसिंगचे पालन केल्याने कोरोनाच्या संसर्गापासून लांब राहता येऊ शकतं.
या अभ्यासात सुचना देण्यात आल्या आहेत की, फेस मास्क, सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि गॉगल्सच्या वापराने तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकता. तज्ज्ञांनी आरोग्यविभागात कार्यरत असलेल्या कर्मचारीवर्गाला सर्जिकल मास्कऐवजी रेस्पिरेटर्स वापरण्याचा सल्ला दिला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगसह वेगवेगळे उपाय केले जात आहेत. फ्रांस, चीन आणि हाँगकाँगमध्ये एक मीटरटचं अंतर ठेवून हॉस्पिट्लस सेक्टर सुरू करण्यात आले आहेत.
यूके चे मंत्री सायमन क्लार्क यांच म्हणणं आहे की, दोन मीटरचं अंतर ठेवूनच लोकांनी वावरायला हवं. एकमेकांशी बोलत असताना अंतर ठेवून सरकारी गाईडलाईन्सचं पालन करायला हवं.
संपूर्ण जगभरातील लोक कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाय शोधण्याचे प्रयत्न करत आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. अनेक देशातील कोरोनाच्या लसीच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आहेत.