CoronaVirus : कोरोना काळात श्वास घ्यायला त्रास झाल्यास हा घरगुती उपाय करणं ठरू शकतं जीवघेणं, वेळीच सावध व्हा By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:02 PM 2021-04-22T19:02:43+5:30 2021-04-22T19:30:16+5:30
CoronaVirus : सीडीसीनं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कापराचा सतत वास घेतल्यानं नाक, गळा,डोळ्यांची जळजळ होऊ शकते. पोटाच्या समस्याही जाणवू शकतात. परिणामी हीच सवय मृत्यूचं कारण ठरू शकते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियावर ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी काय करावं यावर एक घरगुती उपाय चांगलाच व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टमधून दावा केला जात आहे की, कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरी यांची पोटली तयार करून श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल वाढते.
या व्हायरल पोस्टमध्ये कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरी यांची पोटली तयार करून श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल वाढते, असं नमूद करण्यात आलं आहे. ऑक्सिन लेव्हल वाढवण्यासाठी तसंच संबंधित समस्या सोडवण्यासाठी उपाय परिणामकारक ठरत असल्याचं सांगितलं जात आहे.
खरंतर या घरगुती उपायाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तरीसुद्धा सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. कापूर एक ज्वलनशील पांढरा (क्रिस्टलीय) पदार्थ आहे. यात सुगंध जास्त असते. त्यामुळे वेदनेसह खाज येण्याची शक्यता असते.
अभ्यासानुसार कापूर आणि निलगिरीच्या तेलाचा नाकावर कोणताही परिणाम होत नाही. विशेष म्हणजे बंद झालेलं नाक उघडल्यानंतर ऑक्सिजनच्या स्तरावर कोणताही परिणाम होत नाही. याचे पुरावे समोर आले आहेत.
२०१८ मध्ये अमेरिकेत कपरामधील विषारी पदार्थांमुळे ९ हजार ५०० लोकांना संक्रमण झालं होतं. त्यातील १० लोकांचा जीव जाण्याचा धोका होता. एफडीएनं दिलेल्या माहितीनुसार ११ टक्क्यांपेक्षा जास्त कापराचा वापर जीवघेणा ठरू शकतो. यामुळे अटॅक येण्याची ही शक्यता असते.
सीडसीनं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कापराचा सतत वास घेतल्यानं नाक, गळा,डोळ्यांची जळजळ होऊ शकते. पोटाच्या समस्याही जाणवू शकतात. परिणामी हीच सवय मृत्यूचं कारण ठरू शकते.
निलगिरी आणि ओवा यांच्या सेवनानं ऑक्सिजनच्या प्रमाणावर प्रभाव पडतो असं कोणतंही संशोधन समोर आलेलं नाही.
याशिवाय आरोग्य मंत्रालयानंही या उपायांसंबंधी तशा गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत.
त्यामुळे कोरोनाच्या गंभीर स्थितीत कोणतेही उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. (Image Credit- Getty Images)