coronavirus: कोरोनाबाधितामध्ये सर्वप्रथम दिसते हे लक्षण, विषाणू हळूहळू शरीरावर असा करतो हल्ला, वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:20 AM 2021-04-23T11:20:04+5:30 2021-04-23T12:01:21+5:30
coronavirus in India: सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाच्या विषाणूबाबत आतापर्यंत झालेल्या संशोधनामधून या आजाराची लक्षणे आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाच्या विषाणूबाबत आतापर्यंत झालेल्या संशोधनामधून या आजाराची लक्षणे आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणू कशाप्रकारे हळूहळू शरीरावर हल्ला करतो. तसेच या आजारामधून सावरण्यासाठी १४ दिवसांचा वेळ लाागतो, याला इनक्युबेशन पीरियड म्हणतात, याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.
पहिला दिवस पहिला दिवस - कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या ८८ टक्के लोकांना पहिल्या दिवशी ताप आणि थकवा जाणवतो. अनेकांना पहिल्याच दिवशी अंगदुखी आणि कोरडा खोकला येऊ लागतो. चीनमधील अध्ययनानुसार सुमारे १० टक्के लोकांमध्ये ताप आल्यानंतर जुलाब होण्यासारखीही लक्षणे दिसून येतात.
दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत - कोरोनाबाधित रुग्णामध्ये ताप आणि कफ दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत दिसून येतो.
पाचवा दिवस पाचवा दिवस - पाचव्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. विशेषकरून वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तीमध्ये हे लक्षण दिसून येते. मात्र भारतात पसरलेल्या नव्या स्ट्रेनमध्ये कोरोनाच्या अनेक तरुण रुग्णांमध्येही श्वास घेण्यास त्रासासारखे लक्षण दिसून येते.
सहावा दिवस सहावा दिवस - सहाव्या दिवशीसुद्धा खोकला आणि आणि ताप येणे कायम असते. या दिवशी काही लोकांच्या छातीत दुखते. तसेच दाब आणि खेचल्यासारखे वाटू लागते.
सातवा दिवस सातवा दिवस - सातव्या दिवशी छातीत तीव्र दुखण्यास सुरुवात होते. तसेच दाब वाढतो. श्वास घेण्यास त्रास होतो. ओठ आणि चेहरा निळा पडतो. काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते.
मात्र ज्या लोकांमध्ये कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणे दिसतात. अशा लोकांमधील संसर्ग सातव्या दिवसापासून कमी होण्यास सुरुवात होते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या दिवसापासून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसते.
आठवा आणि नववा दिवस आठवा आणि नववा दिवस - चीनच्या सीडीसीनुसार आठव्या आणि नवव्या दिवशी सुमारे १५ टक्के कोरोना रुग्णांमध्ये एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जाणवू लागतो. या स्थितीत फुप्फुसामध्ये फ्लूइड तयार होण्यास सुरुवात होते. तसेच फुप्फुसामध्ये पुरेशा प्रमाणात हवा पोहोचत नाही. त्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागतो.
दहावा आणि अकरावा दिवस दहावा आणि अकरावा दिवस - श्वास घेण्यास होत असलेला त्रास अधिकच वाढतो. तसेच प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला आयसीयूमध्ये भरती करावे लागते. तिथे प्रकृतीत सुधारणा झाल्यावर दहाव्या दिवशी रुग्णाला रुग्णालयातून सोडले जाते.
बारावा दिवस बारावा दिवस - वुहानमधील अभ्यासानुसार बहुतांश लोकांना १२व्या दिवशी ताप येणे बंद होते. काही लोकांमध्ये तरीही कफ झाल्याचे दिसून येते.
तेरावा आणि १४वा दिवस तेरावा आणि १४वा दिवस - या विषाणूचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये तेराव्या आणि चौदाव्या दिवशी श्वास घेण्याची समस्या कमी होऊ लागते.
अठरावा दिवस अठरावा दिवस - अभ्यासानुसार लक्षण दिसल्याच्या पहिल्या दिवसापासून अठराव्या दिवसापर्यंत रुग्ण बाधित होऊन बरा होतो. मात्र अठराव्या दिवशीसुद्धा प्रकृती गंभीर बनलेली असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते.