coronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:49 PM 2020-09-13T15:49:23+5:30 2020-09-13T16:03:08+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पोस्ट कोविड-१९ मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी केले आहेत. या प्रोटोकॉलमध्ये रुग्णाच्या रिकव्हरी आणि सामुहिक स्तरावर विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढत आहे. दरम्यान आता कोरोनामुळे बिघडत असलेली परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पोस्ट कोविड-१९ मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी केले आहेत.
या प्रोटोकॉलमध्ये रुग्णाच्या रिकव्हरी आणि सामुहिक स्तरावर विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही खास सल्लेही देण्यात आले आहेत.
घरात क्वारेंटिन राहून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या प्रोटोकॉलमधून काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा रुग्णांनी मास्क, हातांची स्वच्छता आणि रेस्पिरेटरी हायजीनची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे गांभीर्याने पालन केले पाहिजे. तसेच योग्य प्रणाणात गरम पाण्याचे प्राशन केले पाहिजे.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या औषधांचे सेवक करावे. तसेच प्रकृती साथ देत असेल तर घरगुती काम केले पाहिजे. तसेच ऑफिसचं कामही हळूहळू सुरू करा. यादरम्यान, लोकांनी हलका व्यायाम करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
याशिवाय प्रकृतीची काळजी घेताना रोज योगासने, प्राणायाम आणि मेडिटेशन करावे. तसेच श्वसनाचे व्यायाम करण्याचा सल्लाही देण्यात आले आहे. त्याबरोबरच शारीरिक क्षमतेनुसार रोज मॉर्निंग वॉक आणि इ्व्हिनिंग वॉक करावा.
आपल्या पौष्टिक आहाराला बॅलन्स करावे. ताजे, शिजलेले आणि नरम भोजन सहज पचू शकते. तसेच पुरेशी झोप आणि आराम यांचीही विशेष काळजी घ्यावी,
मद्यपान आणि धुम्रपान करू नये. घरात राहून आपल्या आरोग्याचे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करावे शरीराचे तापमान, रक्तदाब, ब्लड शुगर (मधुमेह असल्यास) आणि पल्स ऑक्सिमेट्रीची माहिती ठेवा.