CoronaVirus : French researchers to test nicotine patches on coronavirus patients myb
CoronaVirus : कोरोनावर निकोटीनची मात्रा प्रभावी ठरणार? संशोधनास सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 04:24 PM2020-04-24T16:24:22+5:302020-04-24T18:07:52+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहकार निर्माण झालेला असताना अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे, की सिगारेटमध्ये निकोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्मोकिंग करत असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका कमी असतो. या अभ्यासावर आधारित फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी कोरोना रोखण्यासाठी रुग्णांवर निकोटीन पॅच टेस्ट करणं सुरू केलं आहे. या संशोधनासंबंधी माहिती 'द गार्डीयन' यात देण्यात आली आहे. पॅरिसच्या एका रुग्णालायात करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की तंबाखू आणि सिगारेटमध्ये आढळत असलेला पदार्थ कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवू शकतो. तरी निकोटीनच्या वैद्यकीय तपसाणीसाठी आरोग्य विभागाची संमती अजून मिळालेली नाही. लोकांना निकोटीनचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करत नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं, कारण हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ५० टक्के लोकांचा मृत्यू निकोटीनच्या अतिसेवनामुळे होतो. धुम्रपान करत असलेल्या लोकांच्या फुप्फुसांवर परिणाम होऊन कोरोनाची गंभीर लक्षणं दिसण्याची शक्यता असते. हा रिसर्च पॅरिसच्या एका रुग्णालयात ४८० लोकांवर करण्यात आला होता. त्यातील ३५० लोकांना रुग्णांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आलं होतं. तर इतरांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे घरी पाठवण्यात आलं होतं. रुग्णालयात भरती केलेल्या ज्या रुग्णांचे वय ६० ते ६५ या वयोगटातील होते. यात असं दिसून आलं की ४.४ टक्के रुग्णांना नियमीत धुम्रपान करण्याची सवय होती. तेच घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांचे वय ४० ते ४४ या वयोगटातील होते. त्याच्यातील ५.३ टक्के लोकांना धुम्रपान करण्याची सवय होती. लोकसंख्येच्या तुलनेत धुम्रपान करत असलेल्यांची संख्या कमी दिसून आली. ४४ ते ५३ या वयोगटातील ४० टक्के लोक धुम्रपान करत होते. तर ६५ ते ७५ या वयोगटात ११ टक्के लोक धुम्रपान करत होते. फ्रान्सचे प्रसिद्ध न्युरोबायोलॉजिस्ट जीन पिअरे चेंजक्स यांच्यामते निकोटीन व्हायरसला शरीरातील रक्तवाहिन्यात जाण्यापासून रोखत असतं. याबाबत करण्यात आलेला रिसर्च इंग्लँड जर्नस ऑफ मेडीसिन्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार चीनमध्ये धुम्रपान करत असलेल्या १००० लोकांमधून फक्त १२.६ टक्के लोकांना व्हायरसचं संक्रमण झालं होतं. संशोधकाच्यामते सामान्य लोकांपेक्षा धुम्रपान करत असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका कमी असतो. अशा लोकांमध्ये लक्षणं सुद्धा दिसून येत नाही. असं असलं, तरी या आधी करण्यात आलेल्या रिसर्चनुसार धुम्रपान करत असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका २४ टक्के जास्त असतो. असं स्पष्ट करण्यात आलं होतं.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सcorona virusHealth Tips