coronavirus game changer device detects virus in air
CoronaVirus News : आता डिव्हाइस हवेत शोधणार कोरोना, पुढील महिन्यात येणार बाजारात By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 10:21 AM2020-10-01T10:21:35+5:302020-10-01T10:41:44+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगात 33,867,247 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस हवेतून पसरतो का? याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही. मात्र, आता कोरोना व्हायरस हवेत आहे की नाही, हे येत्या काही दिवसांत शोधणे सोपे होणार आहे. कॅनडाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी गेम चेंजिंग डिव्हाइस तयार केले आहे. हे डिव्हाईस हवेतील कोरोना व्हायरचा शोध घेण्यास मदत करू शकणार आहे. कंट्रोल एनर्जी कॉर्प (Kontrol Energy Corp) नावाची कंपनी आधीपासूनच घरातील हवेची गुणवत्ता आणि देखरेखीची साधने बनविण्यामध्ये गुंतलेली आहे. कोरोना व्हायरसची महामारी सुरू झाल्यानंतर, कंपनीने कोरोना व्हायरस डिटेक्शन डिव्हाइस डिझाइन करण्याचे काम सुरू केले होते. कॅनडाच्या ओंटारियो येथे दोन प्रयोगशाळांमध्ये कोरोना व्हायरसवर संशोधन केल्यानंतर कंपनीने बायोक्लॉड (BioCloud) नावाचे एक डिल्हाइस तयार केले. बायोक्लॉड डिव्हाइस हँड ड्रायरसारखे दिसते. परंतु हे डिव्हाइस हवा आत ओढते आणि नंतर त्या हवेचे विश्लेषण कोरोना तपासणीसाठी करते. globalnews.ca च्या वृत्तानुसार, कंपनीचे म्हणणे आहे की, बायोक्लॉड डिव्हाइस एखाद्या विशिष्ट ठिकाणी हवेत व्हायरस आहे की नाही, ते शोधणार आहे. जर, बायोक्लॉड डिव्हाइस रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला तर त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांची स्वतंत्रपणे तपासणी करता येईल. हे डिव्हाइस क्लासरुम किंवा कार्यालयात देखील उपयुक्त ठरू शकते. कॅनडामधील वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड हेनरिक्स यांनी बायोक्लॉड डिव्हाइसची चाचणी केली आहे. कंपनी हे डिव्हाइस नोव्हेंबरपर्यंत बाजारात आणणार आहे. याची किंमत सुमारे ८.८ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. दरम्यान, बायोक्लॉड डिव्हाइससाठी कंपनीला जगभरातून ऑर्डर मिळण्यासही सुरुवात झाली आहे. सध्या कंपनी दरमहा २० हजार युनिट्सची निर्मिती करू शकते. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकॅनडाcorona virusCanada