कोरोनाचा रुग्ण नक्की कसा होतो बरा? आत्तापर्यंत कोरोनावर 'हे' उपचार ठरले प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 10:00 AM2020-04-26T10:00:06+5:302020-04-26T10:38:06+5:30

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या लाखांपर्यंत पोहोचली आहे. अद्याप कोरोनावर कोणतंही औषध शोधलेलं नाही. आत्तापर्यंत जास्तीत जास्त औषधांवर रिसर्च करण्यात आला आहे. आधीपासून वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोनाच्या उपचारांसाठी करण्यात येत आहे.

WHO ने सगळ्यात प्रभावी उपाय शोधण्यासाठी चाचणी सुरू केली आहे. ब्रिटेनने दिलेल्या माहितीनुसार या चाचण्यांच्या ट्रायल रिकव्हरीसाठी ५ हजारपेक्षा जास्त लोकांना समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. याशिवाय जगभरातील रिसर्च सेंटरमध्ये कोरोनाला हरवून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताचा वापर उपचारासाठी केला जात आहे.

कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांच्या शरीरातून एंटीबॉडी तयार करून याचा वापर कोरोना रुग्णांवर केला जातो. जेणेकरून व्हायरसचं संक्रमण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

WHO चे डॉक्टर ब्रुस आइलवर्ड यांच्या चीन दौऱ्यादरम्यान असं निदर्शास आलं की, रेमडेसिवीर फक्त अशी औषधं आहेत. जी कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. इबोलासाठी या औषधांचा शोध घेण्यात आला होता. प्राण्यांवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार इतर अनेक जीवघेण्या आजारांवर हे औषध प्रभावी ठरलं होतं. त्यामुळे कोरोनावर उपचार म्हणून सुद्धा हा उपाय परिणामकारक ठरू शकतो.

शिकागो युनिव्हरसिटीच्या नेतृत्वाखाली केलेल्या तपासणीनुसार हा उपाय प्रभावी ठरत असल्याचं स्पष्ट केलं आहे. WHO सॉलिडॅरिटी ट्रायल अंतर्गत चार औषधांवर परिक्षण करत आहे त्यात रेमडेसिवीर याचा सुद्धा समावेश आहे. हे औषध तयार करणारी कंपनी गीलिडसुद्धा यावर अधिक परिक्षण करत आहे.

एचआईवीसाठी वापरली जाणारी औषधं लोपीनावीर आणि रिटोनावीर कोरोना व्हायरसच्या उपायांसाठी प्रभावी ठरत आहे. अशी चर्चा खूप आहे. लॅबमध्ये करण्यात आलेल्या परिक्षणात याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले. पण रुग्णांवर जेव्हा या औषधांचा प्रयोग करण्यात आला तेव्हा फारसा फरक दिसून आला नाही. म्हणून डॉक्टरांमध्ये निराशा होती.

मलेरियाचे औषध सॉलिडॅरिडी ट्रायल आणि रिकव्हरी ट्रायलसाठी वापरण्यात आलं होतं. क्लोरोक्वीन आणि हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन मध्ये व्हायरसला रोकण्याची क्षमता असते. पण हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरल्याची खूप कमी उदाहरणं आहेत.

रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त कार्य करत असेल तर शरीरात सूज येऊ शकते. सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये इंटरफेरॉन बीटांचे परिक्षण करण्यात आलं होतं. याचा वापर शारीरिक समस्या आणि सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

व्हायरसचं शरीरात संक्रमण झाल्यानंतर इंटरफेरॉन नावाचे केमिकल शरीरातून बाहेर पडत असतं. हे एकप्रकारचं स्टेरॉईड आहे. जे सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात एंटीबॉडी महत्वपूर्ण ठरतात. जे व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत असतात.

कोरोना व्हायरसमधून बाहेर आलेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाज्मा काढून संक्रमित व्यक्तीच्या शरीरात टाकले जातात. अमेरिकेत आत्तापर्यंत ५०० लोकांवर या थेरेपीचा वापर यशस्वी ठरला आहे. याला कॉनवॅलेसेंट प्लाज्मा असं म्हणतात.

जर तुम्ही कोरोना व्हायरसने संक्रमित असाल तर तुम्ही लवकरात लवकर बरे सुद्धा होऊ शकता. बेड रेस्ट, पॅरासिटामोल असे उपचार करून रुग्णांची प्रकृती ठिक केली जाऊ शकते. तर काही केसेस मध्ये ऑक्सिजन सपोर्ट किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येत आहे.