CoronaVirus : How to prevent from corona virus tips for you and your family myb
CoronaVirus : कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवाण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 05:27 PM2020-03-31T17:27:52+5:302020-03-31T17:48:39+5:30Join usJoin usNext सध्या कोरोना व्हाय़रसमुळे होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासाठी समाजातील सगळेच लोक वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. कारण जगभरासह भारतात सुद्धा कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यू होत असलेल्यांचा आकडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तर संक्रमण होण्याची भीती असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या संक्रमणापासून कुटुंबाला दूर ठेवायचं असेल तर काय करायला हवं याबाबत सांगणार आहोत. तोंडाला मास्क लावून ठेवा. जेणेकरून इन्फेक्शनचा धोका टळण्यास मदत होईल. शक्यतो कापडाच्या मास्कचा वापर करा. कारण कापडाचा मास्क वापरून झाल्यानंतर तुम्ही धुवू शकता. घातलेले कपडे थेट वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा वेगळ्या बॅगेत ठेवा. कोणीही या कपड्यांना हात लावणार नाही, याची खबरदारी घ्या. बाहेरून आल्यानंतर चपला शक्यतो घराबाहेर काढाव्यात, या चपला ठेवण्यासाठी एक वेगळी जागा असावी. घरातील कोणत्याही वस्तूला हात लावू नका. अगदी डोअरबेल वाजवतानाही अवश्य ती काळजी घ्या. चावी, पर्स, बॅग अशा तुमच्याजवळ ज्या काही वस्तू असतील, त्यांना इतर कुणी हात लावणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवा. मोबाइलला सॅनिटाइझ करून घ्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. कारण मोबाईल आपल्या हातात सतत असतो. त्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता असते. बाहेरून फळं किंवा भाज्या आणल्यानंतर चांगल्या पाण्याने स्वच्छ करून मगच स्वयंपाक घरात ठेवा. सतत हात धुवा. साबणाच्या साबण लावून एकमेकांना घासून चांगले हात धुवा. काम करताना ग्लोव्जचा वापर करा. काम झाल्यानंतर हे ग्लोव्हज काढून टाका आणि कुणाच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्या.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहेल्थ टिप्सcorona virusCoronavirus in MaharashtraHealth Tips