Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी सतत सॅनिटायजर वापरताय? मग त्याचे साइड इफेक्टही जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:58 AM2020-03-11T10:58:46+5:302020-03-11T11:13:50+5:30

Coronavirus : हॅंड सॅनिटायजर सामान्यपणे इथाइल अल्कोहोलपासून तयार केलं जातं. जे अ‍ॅंटी-सेप्टिकसारखं काम करतं. यात पाणी, फ्रेगरेन्स आणि ग्लिसरीन मिश्रित केलं जातं.

कोरोना व्हायरसने भारतात प्रवेश करताच याबाबत लोक चिंतेत आहेत. भीतीमुळे लोक मास्क आणि सॅनिटायजरची खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे या दोन्ही वस्तूंचा तुटवडा बाजारात जाणवू लागला आहे. हात स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित सॅनिटायजरचा वापर करण्यास सांगण्यात येत आहे. त्याचा वापर करावा देखील. पण सॅनिटायजरचा अधिक प्रमाणात वापर करणंही महागात पडू शकतं. म्हणजे कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायजरचा सतत वापर करून भलतीच समस्या होऊ शकते.

हॅंड सॅनिटायजर सामान्यपणे इथाइल अल्कोहोलपासून तयार केलं जातं. जे अ‍ॅंटी-सेप्टिकसारखं काम करतं. यात पाणी, फ्रेगरेन्स आणि ग्लिसरीन मिश्रित केलं जातं. तर अल्कोहोल नसलेल्या सॅनिटायजर अॅंटी-बायोटिक ट्रायक्लोजन किंवा ट्रायक्लोकार्बनपासून तयार केलं जातं. हे साबण आणि टूथपेस्टमध्ये आढळतं.

अमेरिकेतील फूड अ‍ॅंन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून सांगण्यात आले आहे की, ट्रायक्लोजनचे काही नुकसानही आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या काही रिसर्चमध्ये ट्रायक्लोजनच्या वापरावर काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

अ‍ॅंटी-बायोटिक सामान्यपणे बॅक्टेरियापासून लढण्यासाठी सक्षम असतं. पण काय होईल जेव्हा तुमचं शरीर बॅक्टेरियासोबत लढण्याऐवजी अ‍ॅंटीबायोटिक विरोधात लढणं सुरू करेल. ट्रायक्लोजन हेच काम करतं. वास्तवात हॅंड सॅनिटायजरचा जास्त वापर रोगांबाबत प्रतिरोध कमी करतो. कारण याने तुमचे गुड बॅक्टेरिया नष्ट होऊ लागतात. जे बॅड बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत करतात.

२०११ मध्ये अमेरिकेत एपिडेमिक इंटेलिजन्स सर्व्हिसशी निगडीत संशोधक, हेल्थ केअर कर्मचारी जे साबणाऐवजी जास्तीत जास्त सॅनिटायजरचा वापर करतात त्यांना एक्यूट गॅस्ट्रोएंटाइटस आजार देणाऱ्या नोरोव्हायरसचा सहा पट अधिक धोका राहतो.

जर तुम्ही ट्रायक्लोजन नसलेलं सॅनिटायजरचा वापर करत नसाल आणि अल्कोहोलयुक्त सॅनिटायजरचा वापर करत असाल तरी सुद्धा तुम्ही सुरक्षित असालच असं नाही काही सॅनिटायजरमध्ये इथाइल अल्कोहोलच्या जागी दुसरं अल्कोहोल किंवा त्याप्रकारचं दुसरं द्रव्य वापरलं जातं. हे द्रव्य अ‍ॅंटी-मायक्रोबॉयलप्रमाणे सक्रिय होऊन बॅक्टेरियांना मारतं. (Image Credit : realsimple.com)

अमेरिकन फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडून सांगण्यात आलं आहे की, सॅनिटायजरमध्ये केवळ इथाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा दोन्हींचेही ६० ते ९५ टक्के प्रमाण मिश्रित करण्याची मान्यता आहे.

२०१२ मध्ये कॅलिफोर्नियात सहा तरूण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी हॅंन्ड सॅनिटायजरचं सेवन केलं होतं आणि त्यात विषारी अल्कोहोल होतं. यातून हे स्पष्ट झालं होतं की, जर सॅनिटायजरमध्ये विषारी अल्कोहोल असेल तर त्याने त्वचेला नुकसान पोहचू शकतं.

एफडीएने सांगितले की, ट्रायक्लोजनयुक्त सॅनिटायजरमुळे हार्मोनल गडबड होते. जनावरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही सॅनिटायजरचा जास्त वापर कराल तर शरीरातील हार्मोन्स वेगळ्या प्रकारे व्यवहार करू लागतात. सध्या यावरही शोध सुरू आहे. (Image Credit : medassureservices.com)

तसेच रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, ट्रायक्लोजन तुमचं इम्यून सिस्टीमही बिघडू शकतं. ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.

मिशिगन युनिव्हर्सिटीच्या पब्लिक हेल्थ स्कूलच्या संशोधकांना आढळलं की ट्रायक्लोजन मनुष्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीत नकारात्मक प्रभाव करतं. याने तुमचं इम्यून सिस्टीम एलर्जिक होऊ लागतं किंवा टॉक्सिक केमिकल बिस्पीनॉल तुम्हाला नुकसान पोहचवू शकतं. हे प्लास्टिकमध्ये आढळतं.

जर सॅनिटायजर सुगंधित असेल तर याचा अर्थ हा होतो की, यात काही टॉक्सिक केमिकल्स मिश्रित केले आहेत. कंपन्या त्यांचा सीक्रेट सेंट फॉर्मूला लपवण्यासाठी हे सांगत नाहीत की, त्यांनी सॅनिटायजरमध्ये कोणत्या गोष्टी मिश्रित केल्या आहेत. ते यात निदान डझनभर तरी केमिकल्स वापरतात.