WHO ला भीती, २९ देशांमध्ये पसरलेला कोविड-१९ चा नवा लॅंब्डा व्हेरिएंट ठरू शकतो घातक By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 03:55 PM 2021-06-18T15:55:58+5:30 2021-06-18T16:00:19+5:30
WHO ने लॅंब्डा व्हेरिएंटला सध्या व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा की, सर्व देशांनी या व्हेरिएंटवर लक्ष ठेवा. कारण हा जर वेगाने पसरला तर याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये टाकावं लागेल. कोरोना व्हायरस आणि त्याच्या नव्या म्यूटेंट्सने साऱ्या जगाला घाबरवून सोडलं आहे. आता लॅटिन अमेरिकन देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. याला लॅंब्डा असं नाव देण्यात आलं आहे.
WHO नुसार, हा व्हेरिएंट गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वातआधी पेरूमध्ये आढळला होता तेव्हापासून आतापर्यंत हा व्हेरिएंट जगातल्या २९ देशांमध्ये पसरला आहे. पण याचा जास्त प्रभाव सध्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये बघायला मिळत आहे. यात पेरू, अर्जेंटिना, चिली आणि इक्वाडोर यांचा समावेश आहे.
WHO ने लॅंब्डा व्हेरिएंटला सध्या व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा की, सर्व देशांनी या व्हेरिएंटवर लक्ष ठेवा. कारण हा जर वेगाने पसरला तर याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये टाकावं लागेल.
व्हेरिएंट ऑफ कंसर्न कोरोनाचे असे व्हायरस आहेत ज्यांनी सध्या जगाला हैराण केलं आहे. जसे की, अल्फा, बीटा, गामा आणि सध्या जगात थैमान घालत असलेला डेल्टा व्हेरिएंट.
WHO च्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं की लॅंब्डा व्हेरिएंट सर्वातआधी पेरूमध्ये आढळून आला होता. याचं भयावह रूप सध्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये आहे.
पेरूमध्ये यावर्षी एप्रिलपर्यंत जेवढ्या कोरोनाच्या केसेस आढळल्या त्यातील ८१ टक्के केसेस लॅंब्डा व्हेरिएंटच्या आहेत. चिलीमध्ये एकूण कोरोना केसेसपैकी ३२ टक्के केसेस या व्हेरिएंटच्या आहेत.
WHO ला शंका आहे की, हा लॅंब्डा व्हेरिएंट जास्त संक्रामक आणि अॅंटीबॉडीजला धोका देणारा ठरू शकतो. WHO ने जगभरात पसरलेल्या कोविड १९ व्हेरिएंटसाठी लेबल काढले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर या व्हेरिएंट्सचं नामकरण केलं आहे. यात ते व्हेरिएंटही आहेत जे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात आढळले होते.
आधी तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की, कोरोना व्हायरसच्य व्हेरिएंटचं नाव वेगळं असू शकतं. पण त्याचं खरं नाव SARs-CoV-2 आहे. यामुळे तुम्हाला जे संक्रमण होतं त्याला Covid-19 म्हणतात. पण हा व्हायरस सतत स्वत:ला बदलत आहे. म्यूटेट होत आहे. डबल आणि ट्रिपल म्यूटेट होत आहे. हा बदलला तर औषधे, उपचाराच्या पद्धती आणि टेस्टींग बदलतं. भलेही हे बदल सामान्य असतील. पण बदल तर आहेतच. मग कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटच्या नावांमध्ये बदल होणं गरजेचं होतं. त्यामुळे WHO ने हे पाउल उचललं.
WHO ने कोरोना व्हायरस आणि त्यांच्या सर्वच व्हेरिएंटवर जानेवारी २०२० पासून लक्ष ठेवलं आहे. २०२० च्या शेवटी शेवटी कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट आणि म्यूटेशन येऊ लागले. याने सर्व जगाला धोका होता. तेव्हा WHO ने या कोरोना व्हेरिएंटला दोन श्रेणींमध्ये विभागलं. पहिली व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट आणि दुसरा व्हेरिएंट ऑफ कंसर्न. जेणेकरून कोरोनाच्या व्हेरिएंटनुसार उपचार आणि आरोग्यासंबंधी व्यवस्था केली जाऊ शकेल.
कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनवर वेगवेगळे देश WHO ला सूचना देत होतेच. सोबतच आंतरराष्ट्रीय संघटनातील एक्सपर्टही देशांना नव्या व्हेरिएंटच्या हिशेबाने ट्रीटमेंटपासून ते कोविड मॅनेजमेंटपर्यंत गाइडलाइन्स सांगत होते. आता WHO ने कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटला नावं दिले आहेत. ते ग्रीक अक्षरातून दिले आहेत. जसे अल्फा, बीटा, गामा, डेल्टा इत्यादी.