CoronaVirus Live Updates : अरे व्वा! गायीचं दूध रोखू शकतं कोरोनाचा संसर्ग, कारण...; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:39 PM2022-03-09T15:39:19+5:302022-03-09T16:07:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,575 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून खबरदारी घेतली जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच तुमची प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या, असा सल्लाही डॉक्टर देतात. या यादीत दूध हे नेहमीच आपल्या आरोग्यदायी आहारातील महत्त्वाचा भाग राहिलं आहे.

काहींना दूध पिणं आवडतं तर काहींना आवडत नाही. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गायीचे दूध पिणे सर्वात फायदेशीर आहे. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, मेंदू तल्लख होतो आणि काम करण्याची क्षमता वाढते.

गायीचे दूध कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त आहे अशी माहिती देखील आता संशोधनातून समोर आली आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे.

गायीच्या दुधात व्हायरस प्रतिबंधक गुणधर्म असलेलं प्रोटीन असते. हे प्रोटीन एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखू शकतं. हा रिसर्च 'जर्नल ऑफ डेअरी सायन्स'मध्ये प्रसिद्ध झाला आहेत.

सस्तन प्राण्यांच्या दुधात लॅक्टोफेरिन नावाचे प्रोटीन आढळते. संशोधकांना त्यांच्या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की गायीच्या दुधात बोवाइन लॅक्टोफेरिन नावाचे प्रोटीन आढळते, जे अनेक सूक्ष्मजंतू, विषाणू आणि इतर गोष्टींशी लढण्यास सक्षम आहे.

चाचणी दरम्यान, असे आढळून आले की हे प्रोटीन SARS-CoV-2 विषाणूचा लक्ष्य पेशींमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करते. तसेच पेशींना विषाणूविरूद्ध लढण्यास मदत करत असल्याची माहिती मिळत आहे.

मिशिगन विद्यापीठातील अंतर्गत औषध विभागाचे मुख्य अन्वेषक जोनाथन सेक्स्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी क्लिनिकल चाचण्यांदरम्यान बोवाइन लॅक्टोफेरिनने अँटीव्हायरल एक्टिव्हिटी दाखवली आहे.

उदाहरणार्थ, बोवाइन लॅक्टोफेरिन असलेली औषधे व्हायरल इन्फेक्शनची तीव्रता कमी करण्यास सक्षम आहेत. यामध्ये रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरसचा समावेश आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोवाइन लॅक्टोफेरिनचे व्यापक अँटीव्हायरल प्रभाव, सुरक्षितता, कमीत कमी दुष्परिणाम आणि व्यावसायिक उपलब्धता लक्षात घेता, SARS-CoV-2 संसर्गाच्या उपचारांमध्ये किंवा रोगानंतरच्या काळजीमध्ये त्याचा वापर केल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना व्हायरस हा अजूनही आपल्यामध्ये आहे. या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट जगात कधीही येऊ शकतो. अशा स्थितीत सध्या कोरोनाबाबत गाफील राहणं योग्य नाही. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो.

कोविड तज्ज्ञ डॉ जुगल किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. म्युटेशनमुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.

नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे. लोकांमध्ये संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. पण यामुळे लोकांना असं वाटू नये की कोरोना आता कायमचा संपला आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव कुमार अग्रवाल म्हणतात की, जगात एका आठवड्यासाठी सरासरी 15 लाखांहून अधिक प्रकरणे दररोज येत आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे.