CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:55 AM 2020-07-20T10:55:49+5:30 2020-07-20T11:15:23+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात पालकांची चिंता वाढवणारा एक रिसर्च आता समोर आला आहे. लहान मुलांवर व्हायरसचा कसा परिणाम होतो याबाबतची मठी माहिती आता मिळाली आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीच्या वर पोहोचली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवनवीन संशोधन करण्यात येत असून यामधून व्हायरससंबंधित महत्त्वाची माहिती मिळत आहे.
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. विविध ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या संकटात पालकांची चिंता वाढवणारा एक रिसर्च आता समोर आला आहे. लहान मुलांवर व्हायरसचा कसा परिणाम होतो याबाबतची मोठी माहिती आता मिळाली आहे.
कोरोनाचा धोका हा 13 ते 19 वयोगटातील मुलांना अधिक असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. दक्षिण कोरियात तब्बल 65 हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर रिसर्चमधून मोठा खुलासा झाला आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 19 या वयोगटामुळे सर्वात जास्त आणि जलद कोरोनाचा प्रसार होतो. 10 वर्षांच्या खालच्या वयोगटातील मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची संख्या कमी आहे.
मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलापासून कोरोनाचा धोका हा फारच कमी आहे. त्यांच्यापासून व्हायरसचा संसर्ग जास्त होत नाही.
लहान मुलांमुळे देखील कोरोनाचा प्रसार होतो ही महत्त्वाची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा धोका हा मोठ्या व्यक्तींना अधिक असला तरी लहान मुलांमध्ये कोरोनामुळे गंभीर स्थिती फारशी निर्माण होत नसल्याचे देखील तज्ज्ञांचे मत आहे.
कमी मुलांना कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो, असे समोर आले आहे. मात्र कोरोनाच्या संकटात मुलांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे.
कोरोनाचा संसर्ग झाला तरी बहुतांश मुलांमध्ये सौम्य लक्षणेच दिसतात, असे या संशोधनातून समोर आले आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी दिसून आले आहे.
भारतातही कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40,425 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 43 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 27,497 वर पोहोचला आहे.
दिल्लीतील काही रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या चिमुकल्यांमध्ये कावासाकी या नावाच्या गंभीर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे.
दिल्लीतील काही रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या चिमुकल्यांमध्ये कावासाकी या नावाच्या गंभीर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे.