CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:36 PM 2020-06-11T12:36:08+5:30 2020-06-11T12:48:48+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एका रिसर्चमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 74 लाखांच्या वर गेली असून तब्बल चार लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 9996 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 357 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 86 हजार 579 वर पोहोचली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 41 हजार 029 झाली आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध झालेलं नाही.
लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एका रिसर्चमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे.
O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आलं आहे. कोरोनाचे विषाणू प्रत्येक रक्तगटात वेगवेगळे दिसून येत आहेत त्यामध्ये O रक्तगट असणाऱ्यांना धोका कमी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
जवळापास 75 हजार लोकांवर हा रिसर्च करण्यात आला. त्यामध्ये इतर कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत O रक्तगट असलेल्या लोकांना 13 ते 26 टक्के कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका कमी असतो.
O रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत इतर रक्तगट असलेल्या लोकांमध्ये संशोधकांना कोणताही महत्त्वपूर्ण फरक दिसला नाही.
O रक्तगट असणाऱ्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं.
लोकांना विचारलेले प्रश्न आणि डेटा कलेक्शनवर सध्या आधारीत असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये O रक्तगटामधील लोकांची रुग्णालयातील संख्या कमी असल्याचंही लक्षात आलं.
दोन विभागांमध्ये हा रिसर्च करण्यात आला. कोरोना झालेले रुग्ण आणि कोरोना न झालेल्या लोकांवर हा रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार तज्ज्ञांनी हा दावा केला आहे.
O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोना व्हायरसाचा सर्वात धोका कमी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.