CoronaVirus : Moderna enters phase 2 and russia to start using avifavir for covid19 treatment myb
आता कोरोना विषाणूला ९९ टक्के नष्ट करणारी लस येणार; क्लिनिकल ट्रायलचे 2 टप्पे यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:34 PM2020-06-02T16:34:05+5:302020-06-02T16:55:12+5:30Join usJoin usNext जगातील सर्वच शास्त्रज्ञ कोरोनाला रोखण्यासाठी लस आणि औषध शोधत असताना आता एक चांगली बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील एक कंपनी लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. तसंच चीनमध्ये सुद्धा एक लस फेज टू म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातून व्यवस्थित बाहेर आली असून आता पुढच्या वर्षी बाजारात ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये आतापर्यंत माणसांवर पाच लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. Sinovac Biotech कंपनीने दावा केला आहे की त्यांची लस ही ९९ टक्के परिणामकारक ठरेल. रुस या लसीचं ट्रायल दोन आठवड्यांमध्ये सुरू करणार आहे. Moderna लसीचे क्लिनिकल ट्रायल फेज २ मध्ये असून ६०० लोकांना देण्यात येणार आहे. जगभरात १२० लसींचे परिक्षण सुरु आहे. त्यातील १० लसींचे माणसांवर परिक्षण करण्यात आले आहे. चीनी कंपनी Sinovac यांनी लस ९९ टक्के प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. चीनच्या ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीचे adenovirus vaccine, Moderna चे एमआरएनए आणि नोवावॅक्स या लसीच्या ट्रायलचे सुरूवातीचे निकाल परिणामकारक आहेत. अमेरिकेतील कंपनी मॉर्डनाच्या लसीने संशोधनात आशेचा किरण दाखवला आहे. या लसीच्या फेज २ मध्ये ५०० लोकांना या लसीचा डोस देण्यात आाला होता. या कंपनीने कोरोनाची एमआरएनए लस तयार केली आहे. ही लस शरीरात गेल्यानंतर व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्तीची क्षमता वाढेल. तसंच फेज १ ट्रायलमध्ये प्रोटेक्टिव्ह एंटीबॉडिज तयार करण्यासाठी फायदेशीर ठरेल. चीनमध्ये लसीचे पाच ट्रायल माणसांवर होत आहेत. याबाबतीत चीन सगळ्याच देशांच्या पुढे आहे. बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स एंड चीन नॅशनल बायोटेक ग्रुप कंपनीने जाइंट वैक्सीन फेस २ ची टेस्टिंग पूर्ण केली आहे. रॉयर्सच्यामते लस तयार होण्यासाठी पुढच्यावर्षीपर्यंत वेळ लागू शकतो.टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newscorona virus