CoronaVirus : New symptoms bone pain and tingling sensation cause covid 19 myb
चिंता वाढली! समोर आली कोरोना विषाणूंची नवी लक्षणं, दुर्लक्ष केल्यास संक्रमणाचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 09:49 AM2020-05-21T09:49:30+5:302020-05-21T10:12:46+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांची आणि मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. अमेरिका, इटली आणि ब्रिटनच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या संक्रमणाच्या केसेस कमी असल्या तरी मृतांच्या आकड्यात दररोज होणारी वाढ चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं आढळतात. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढत चालला आहे. तसतसं कोरोनाची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. सध्या कोरोनाचं आश्चर्यकारक लक्षणं समोर येत आहे. याला पैरोथीसिया असं म्हटलं जातं. ब्रिटेनच्या रुग्णांमध्ये दिसून आलेली प्रमुख लक्षणं: सुरुवातील ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्यांचा त्यात समावेश होता. काही आठवडे आधी चव न समजणं, वास न येणं ही लक्षणं दिसून येत होती. ब्रिटेनच्या एक्सप्रेस डॉट को डॉट यूके यांच्या रिपोर्टनुसार हातांमध्ये तीव्र वेदना आणि मुंग्या येणं हे कोरोनाचं लक्षणं असल्याचे स्पष्ट केले जात आहे. रिपोर्टनुसार इंग्लंडमधील कोरोना रुग्णांना हातांना मुंग्या येण्यासोबतच वेदनादेखील होत होत्या. काही रुग्णांनातर वीजेचा शॉक लागल्याप्रमाणे संपूर्ण शरीरात मुंग्या येत होत्या. एका रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, हाताला मुंग्या येणे, हे त्याच्यात कोरोनाचे पहिल्यापासूनचे लक्षण होते. या नव्या लक्षणाचे नाव पॅराथीसिया आहे, आणि यामध्ये सुई किंवा पिन टोचल्यासारख्या वेदना जाणवतात. न्यूयॉर्कमध्ये माऊंट सिनाई डाऊन टाऊनचे संसर्ग नियंत्रण आणि प्रतिबंध संचालक डॉ. वलीद जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार विषाणूंच्या संसर्गाविरोधात इम्यून सिस्टमच्या प्रतिक्रियेमुळे हे लक्षण जाणवते. विषाणूंनी शरीरात प्रवेश करताच आपल्या प्रतिकारक पेशी सक्रिय होतात. यामुळे शरीरात अनेक प्रकारचे रसायनं तयार होतात, म्हणून मुंग्या आल्यासारखे वाटते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोना रूग्णांना सुद्धा सुई किंवा पिन टोचल्यासारख्या वेदनांचा अनुभव आला आहे. सध्या या लक्षणाच्यामागचं निश्चित कारण सांगणं कठीण आहे. परंतु, तज्ज्ञांचे मत आहे की, नेहमी अनियमित ब्लड सर्क्युलेशन किंवा तंत्रिकांवरील दबावामुळे असा त्रास होतो. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हातात मुंग्या येण्यामागची अनेक कारणं सुद्धा असू शकतात. हाताला वेदना आणि मुंग्या आल्यास तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असं समजणं चुकीचं ठरेल. सुका खोकला, घशात खवखव आणि ताप ही लक्षणं सुद्धा असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सcorona virusHealth Tips