CoronaVirus News: children fight off coronavirus secret lie innate immune response
CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा By ravalnath.patil | Published: September 27, 2020 11:59 AM2020-09-27T11:59:53+5:302020-09-27T12:24:21+5:30Join usJoin usNext प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांवर कोरोना विषाणूचा परिणाम का कमी होतो? बहुतेक मुले कोरोनामुळे आजारी का पडत नाहीत किंवा कोरोनामुळे आजारी पडली तरी सामान्यत: ती बरी कशी होतात? कोरोना महामारीच्या प्रारंभापासूनच या प्रश्नांबद्दल एक गूढ रहस्य होते. मात्र, शास्त्रज्ञांनी आता या विषयावरील अभ्यास पूर्ण केला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीचा (इम्युन सिस्टम) एक असा भाग असतो. ज्यामुळे जंतू नष्ट होतात. मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी ही इम्युन सिस्टम काम करते. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना विषाणू मुलांच्या शरीराला हानी पोहोचविण्याआधीच इम्युन सिस्टमची ही खास ब्रांच कोरोनाला नष्ट करते. संसर्ग रोगतज्ज्ञ आणि स्टडीचे प्रमुख लेखिका डॉ. बेत्सी हॅरोल्ड यांनी सांगितले की, 'मुलांची इम्युन सिस्टम कोरोना विषाणूवर वेगळी वागते आणि त्यांना संरक्षण देते. प्रौढांच्या इम्युन रिस्पॉन्समध्ये म्युटेशन आधीच झाले असते.' अभ्यासानुसार, अपरिचित जंतू शरीराबरोबर संपर्कात येताच मुलांच्या इम्युन सिस्टमचा एक भाग काही तासांत प्रतिसाद देऊ लागतो. याला 'इनेट इम्युन रिस्पॉन्स' म्हणून ओळखले जाते. शरीरास संरक्षण देणारी इम्युन सिस्टम त्वरित विषाणूशी लढा देते आणि बॅकअपसाठी सिग्नल पाठविणे देखील सुरू करते. खरंतर, मुलांचे शरीर बहुतेक वेळेस अपरिचित जंतूंच्या संपर्कात येतात आणि अशा जंतू त्यांच्या इम्युन सिस्टमसाठी नवीन असतात. त्यामुळे त्यांची इम्युन सिस्टिम जलद सुरक्षा प्रदान करते. संशोधकांनी इम्युन सिस्टम समजण्यासाठी 60 प्रौढ आणि 65 मुले आणि 24 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांचा अभ्यास केला. या सर्व लोकांना न्यूयॉर्क शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी असे आढळून आले आहे की, मुलांच्या रक्तात इम्युन मॉलेक्यूल्स interleukin 17A आणि interferon gamma ची पातळी अधिक असते. तर ही मॉलेक्यूल्स वय वाढण्यासोबत लोकांमध्ये घटताना दिसून आली. मुलांमध्ये अँटीबॉडी रिस्पॉन्स सर्वात अधिक असतात, त्यामुळे मुले कोरोनापासून बचाव करू शकतात, असे यापूर्वी काही सिद्धांतात असे म्हटले जात होते. मात्र, नवीन अभ्यासात असे आढळले आहे की, बहुतेक अँटिबॉडीज वयस्कर आणि अत्यंत आजारी व्यक्तींमध्ये असतात तर मुलांच्या शरीरात नसतात. नवीन अभ्यासामुळे संशोधकांची चिंता देखील वाढू शकते. कारण, हे दर्शविते की अधिक अँटिबॉडीज कोरोनाशी लढण्यापेक्षा जास्त आजारी पडण्याचा पुरावा असू शकतात. प्रत्येकजण अँटिबॉडीजबद्दल आनंदी आहे. मात्र ही शक्यता आहे की, काही अँटिबॉडीजची अधिक मात्रा आपल्यासाठी चांगल्या नाहीत तर धोकादायक ठरू शकतील?, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ जेन सी बर्न्स यांनी सांगितले. तसेच, सुरुवातीला इम्युन रिअॅक्शननंतर मुलांच्या शरीरात काय बदल घडतात, हे संशोधकांनाही शोधून काढावे लागेल, असे जेन सी बर्न्स यांनी म्हटले आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus