CoronaVirus News : China bat woman warns coronavirus just the tip of the iceberg myb
चीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:44 AM2020-05-26T11:44:13+5:302020-05-26T12:07:47+5:30Join usJoin usNext चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा गंभीर स्थितीत चीनमधील तज्ज्ञांनी धक्कादायक दावा केला आहे. चीनमधील एक प्रमुख वायरोलॉजिस्ट यांनी नवीन व्हायरसच्या आक्रमणाबाबत सांगताना कोरोना व्हायरस हा त्यातील एक लहानसा भाग असून नवीन समस्यांची सुरूवात असल्याचे सांगितले आहे. वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीचे डेप्यूटी डायरेक्टर शी झेंगली यांनी चीनच्या सरकारी माध्यमांवर माहिती देताना या नवीन व्हायरसबाबत धोक्याची सुचना दिली आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार झेंगली यांनी वटवाघळांमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसवर रिसर्च केला आहे. त्यामुळे त्यांना चीनची 'बॅट वुमन' असं म्हटलं जातं. व्हायरसवर जे रिसर्च करण्यात येतात त्याविषयी संशोधक आणि सरकारमध्ये पारदर्शकता असायला हवी. संशोधनाचे सुद्धा राजकारण केले जाते. हे पाहून दुःख होत असल्याचं, शी झेंगली यांनी सांगितले CCTN ला शी झेंगली दिलेल्या माहितीनुसार जर माणसांना पुढील काळात होणाऱ्या संक्रमणापासून तसंच आजारांपासून वाचवायचं असेल तर अज्ञात व्हायरसबाबत माहिती मिळवून लोकांना सुचना द्यायला हवी. जर अज्ञात व्हायरसवर रिसर्च करण्यात आला नाही तर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने लोकांना संक्रमण होऊन आजार पसरण्याची शक्यता असल्याचे झेंगली यांनी सांगितले. जगभरातील अनेक देश वुहानमधील चीनी लॅबकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पाहत आहेत. अमेरिकेतील पोम्पिओ यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस चीन लॅबमधून पसरल्याचे पुरावे आहेत. पण चीन आणि वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीने हे आरोप मान्य केलेले नाहीत. Read in Englishटॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtracorona virus