खुशखबर! अंतिम टप्प्यात पोहोचली ऑक्सफोर्डची लस; 'या' महिन्यात दाखल होणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:55 PM2020-06-26T12:55:01+5:302020-06-26T13:07:02+5:30

कोरोना व्हायरसं वाढतं संक्रमण लक्षात घेता आनंदाची बातमी समोर येत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्‍सफर्ड आणि AstraZeneca या लसीचे परिक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जगभरात सुरू असलेल्या लसीच्या संशोधनात ही लस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. युकेमधील १० हजारांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना आणि लहान मुलांना दिली जाणार आहे.

भारतातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने यात १०० मिलियन डॉलर्सचा खर्च केला आहे. जेणेकरून भारत आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जाऊ शकतो. या लसीचे वैद्यकिय परिक्षण आफ्रिका आणि ब्राजिलमध्ये केलं जात आहे.

ही लस ChAdOx1 व्हायरसपासून तयार झाली आहे. सामान्य व्हायरसचं कमकुवत आणि निष्क्रीय स्वरुप आहे. हा व्हायरस माणसांना संक्रमित करू शकत नाही.

ऑक्सफोर्ड वॅक्सीन ग्रुपचे प्रमुख एंड्रयू पोलार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकिय परिक्षणात या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही लस वयस्कर लोकांसाठी किती परिणामकारक ठरते. याबाबात परिक्षण केले जाणार आहे.

ऑक्सफोर्ड वॅक्सीन ग्रुपला ही लस या वर्षाच्या शेवटापर्यंत येण्याची आशा आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील जेनर इंस्टिट्यूटचे प्रमुख आणि प्रोजेक्ट लीडर प्रोफेसर एड्रियन हिल यांनी सांगितले की, कोविड १९ च्या या लसीचे प्राण्यांवर केलेल्या परिक्षणात सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

या लसीचे मानवी परिक्षण लवकरच सुरू होणार असून लस आता शेवटच्या ट्प्प्यात आहे. ही लस ऑक्टोबरपर्यंत तयार होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार १२ जूनला १० प्रयोगिक लसी एडवांस क्लिनिकल ट्रायलसाठी तयार केल्या जाणार आहेत.

अमेरिकेतील Moderna Inc आणि चीनचा कंपनी Sinovac Biotech कंपनीचे ट्रायल पुढच्या आढवड्यात अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे.