मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 04:46 PM2020-08-07T16:46:41+5:302020-08-07T19:08:01+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या माहामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या संक्रमणातून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर येत असले तरी मृतांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी लस आणि औषधं शोधण्यासाठी जगभरातील अनेक देशातील तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. भारतातही स्वदेशी आणि सुरक्षित कोरोनाची लस तयार करण्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कमीतकमी किमतीत भारतासह अनेक देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भारतातील लस निर्मीती करत असलेल्या कंपन्यांचा आहे. आता पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आणखी एक पाऊल उचललं आहे. सीरम इन्स्टिट्युट, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लशीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. सीरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत जवळपास १०० दशलक्ष डोस पुरवण्याच्या तयारीत आहेत. या लशीची किंमत जास्तीत जास्त ३ यूएस डॉलर म्हणजे फक्त २२५ रुपये असेल. याबाबत गेट्स फाऊंडेशन सीरम इंस्टिट्यूटने माहिती दिली आहे. भारतातील सीरम इंस्टीट्युट ही जगातील आघाडीच्या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. दरम्यान, कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठानेसुद्धा कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्यासाठी सीरम इंस्टीट्युटसोबत करार केला आहे. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह लसींबाबत करार केला आहे. लसीचे ट्रायल यशस्वी होऊन त्याला परवानगी मिळाली तर सीरम इंस्टिट्यूटला लसीच्या उत्पादनासाठी हा निधी मिळणार आहे. दरम्यान ज्या लोकांना रक्तदाबासारखे आजार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याला अधिक सांभाळायला हवं. घराबाहेर पडू नये", असा सल्ला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी दिला होता. मास्कचा आणि सॅनिटायजरचा वापरचा वापर आता लोकांच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. कारण जोपर्यंत लस किंवा औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याशिवाय दुसरा उपाय नाही.टॅग्स :आरोग्यकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्याभारतHealthCoronaVirus Positive Newscorona virusIndia