आता नशायुक्त पदार्थांपासून तयार होणार कोरोनाची लस; लवकरच माणसांवर होणार चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:56 PM2020-05-19T16:56:18+5:302020-05-19T17:19:28+5:30

कोरोना व्हायरसमुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लस तयार करण्याबाबत अमेरिकेतील एका सिगारेट तयार करत असलेल्या कंपनीने लस विकसित करण्याचा दावा केला आहे. काही दिवसातच या लसीचे परिक्षण लोकांवर करण्यात येणार आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेरिकन ब्रिटिश तंबाखू (BAT) कंपनीला या लसीच्या प्री क्लिनिकल चाचणीमध्ये चांगले रिजल्ट दिसून आले आहेत. लवकरात लवकर या लसीची चाचणी माणसांवर केली जाणार आहे.

लंडनमधील सिगारेट तयार करणारी कंपनी 'लकी स्ट्राइक' यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग रेगुलेटर ऑथोरिटीने या लसीवर परिक्षण करण्याची परवानगी दिल्यास जून महिन्याच्या शेवटापर्यंत या लसीची पहिली चाचणी केली जाईल.

कोरोना व्हायरसची लस तयार करण्याासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. १०० पेक्षा जास्त देशांनी कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी दावा केला आहे.

ब्रिटिश अमेरिका या तंबाखू तयार असलेल्या कंपनीसोबत फिलिप मॉरिस इंटरेशनल सुद्धा रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लस तयार करण्याचा दावा केला आहे. BAT ची सहाय्यक कंपनी सुद्धा ही लस तयार करण्यासाठी तंबाखूच्या पानांचा वापर करत आहे.

BAT ने दावा केला आहे की, ही लस करण्याची पद्धत इतर लसी तयार करण्याच्या तुलनेत जलद गतीने होणारी आहे. सध्याच्या काळात लवकरात लवकर वॅक्सिन उपलब्ध होण्याची आवश्यकता असून ही लस तयार केल्यास लागणारा वेळ वाचवता येऊ शकतो. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.