श्वास सोडल्यानंतर १ तास हवेत जिवंत राहतो कोरोना विषाणू? तज्ज्ञांनी सांगितलं की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:47 AM2020-07-13T11:47:48+5:302020-07-13T12:19:32+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती सध्या समोर येत आहे. ब्रिटेनच्या इंपेरियअल कॉलेज लंडनच्या प्रोफेसर वेंडी बार्कली यांनी दिलेल्या माहितीनुसार श्वास सोडल्यानंतर एका तासापर्यंत हवेत कोरोना व्हायरस जीवंत राहू शकतो.

प्रोफेसर वेंडी बार्कली यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस फक्त शरीरात नाही तर एखादं सामान किंवा कोणत्याही परिसरात सर्वाधिक जीवंत राहू शकतो. याचे पुरावे मिळायला सुरूवात झाली आहे.

बीबीसीच्या एका कार्यक्रमात वेंडी बार्कली यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या लहानात लहान असलेल्या ड्रॉपलेट्समुळेही संक्रमण पसरण्याची शक्यता असते.

त्यामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला वातावरणतील हवा कारणीभूत असू शकते. इंपेरियल कॉलेज लंडनच्या प्राध्यापकांनी लॅबमध्ये केलेल्या अभ्यासातून दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस हवेत एक तासापेक्षा जास्त जीवंत राहू शकतो. याआधीही जागतिक आरोग्य संघटनेने हवेतून होत असलेल्या कोरोना संक्रमणाबाबत माहिती दिली होती.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस नाकातोंडातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे पसरतो.

शिंकण्यातून किंवा खोकण्याातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समधून संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो किंवा संक्रमित व्यक्तीशी बोलतानाही कोरोना विषाणूंची लागण होऊ शकते. म्हणून सोशल डिस्टेंसिंग पाळूनत कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क साधायला हवा.

बंद जागेत हवा खेळती राहत नाही. अशा जागी कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. काही तज्ज्ञांचे असे सुद्धा म्हणणे आहे की, व्हेंटिलेशन नसलेल्या किंवा एसी असलेल्या खोलीत कोरोना रुग्ण असल्यास इतरांपर्यंत हवेमार्फत संक्रमण पसरू शकतं.

Read in English