'या' थेरेपीने कोरोनाचे रुग्ण होणार १०० टक्के बरे होणार, पहिली चाचणी ठरली यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 09:49 AM2020-05-19T09:49:03+5:302020-05-19T10:02:48+5:30

कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वच देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत कोणतेही परिणामकारक औषध किंवा लस कोरोनासाठी उपलब्ध झालेली नाही. सर्वच देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अलिकडे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोनाची उपचारपद्धती विकसित करण्याबाबत दावा केला आहे. अमेरिकेतील सीडर-सिनाई मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी कोरोनाच्या उपचारांबाबत संशोधन केलं आहे. हे संशोधन घातक व्हायरसपासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरेल.

जर्नल बेसिक रिसर्च इन कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कोरोनाने संक्रमित असलेल्या रुग्णांचे हार्ट सेल थेरेपीने उपचार करता येऊ शकतात. या थेरेपीमध्ये लॅबमध्ये विकसित करण्यात आलेल्या हृदयाच्या पेशींना रुग्णांच्या शरीरात टाकले जाते.

या पेशी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतात. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या पेशी शरीरात विशिष्ट प्रकारचे शुक्राणू दिसून येतात. असे शुक्राणू संपूर्ण शरीरात फिरून आजारांना नियंत्रणात ठेवत असतात.

या थेरेपीला CAP-1002 नावाने ओळखलं जातं. या थेरेपीमध्ये कार्डियोस्फेयर डेराइव्ड सेल्सचा वापर केला जातो. प्रयोगशाळेत या पेशी माणसाच्या हृदयाच्या सेल्सपासून तयार केले जातात. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या काही प्रयोगांमध्ये कोरोनाचे रुग्ण या थेरेपीमुळे ठणठणीत बरे झाले होते. याशिवाय कोरोना रुग्णांवर या थेरेपीमुळे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून येत नाही.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या थेरेपीचा वापर आत्तापर्यंत ६ रुग्णांवर करण्यात आला आहे. ज्या लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. असे रुग्ण हार्ट सेल थेरेपीमुळे बरे झाले होते. हार्ट सेल थेरेपीमुळे बरे झालेले ५ रुग्ण व्हेंटिलेटरवर नव्हते. फक्त एका रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासत होती. या थेरेपीच्या ३ आठवड्यानंतर सगळ्याच रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

संशोधक आता मोठ्या स्तरांवर या थेरेपीचं ट्रायल करण्यासाठी तयारी आहेत. हे ट्रायल यशस्वी ठरल्यास कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे उपचार करण्याासाठी फायदेशीर ठरेल.