CoronaVirus News : पोटातील जंतू मारण्याच्या औषधाने होणार कोरोना नष्ट; तज्ज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:38 PM2020-05-21T12:38:44+5:302020-05-21T12:48:42+5:30

जगभरातील अनेक देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना आता रुग्णांना वाचवण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचे प्रयोग केले जात आहेत. कारण सध्या कोरोनावर कोणतीही लस किंवा औषधं उपलब्ध झालेलं नाही.

आयव्हरमॅक्टिन (Ivermectin) हे खूपच स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे औषध आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधांचा वापर केला जातो. भारतासह जपान, बांग्लादेश या देशात उपचारांसाठी या औषधांचा वापर केला जात आहे. या औषधाचे परिणाम समाधानकारक आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या औषधाचे ट्रायल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयव्हरमॅक्टिन एक असं औषधं आहे जे WHO त्या वर्मिंग प्रोग्रामचा भाग आहे. WHO सुरक्षा यादीत या औषधाचा समावेश होतो. हे एक औषधं आहे हे पोटातील जंतू मारण्यासाठी म्हणजेच डी-वर्मिंग टॅबलेट म्हणून ओळखली जाते. आता हेच औषध कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये उपयोगी ठरू शकतं. भारतातील केरळ, उत्तरप्रदेशातील कानपूर आणि दिल्लीतील अनेक दवाखान्यांमध्ये या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे.

मोनाश युनिव्हरसिटीमधिल ऑस्ट्रेलिया आणि विक्टोरियन इंफेक्शियस डिसीज रेफरेंस लॅबमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की, ४८ तासात हे औषध कोरोना व्हायरसला मारू शकतं. तसंच संशोधकांच्यामते कोरोना व्हायरसचा आरएनए ९३ टक्क्यांपर्यंत कमकुवत झाला होता.

हा रिसर्च आतापर्यंत माणसांवर करण्यात आलेला नाही. पण बांग्लादेशातील एका खाजगी रुग्णालयामधील डॉक्टरांनी हा प्रयोग केला आहे. बांग्लादेशातील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांनी ६० कोरोना रुग्णांना आव्हरमॅक्टिन या औषधासोबत एक अंटीबायोटीक औषध डॉक्सीसाइक्लिन देण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ७२ तासांना रुग्णाचे रिपोर्ट निहेटिव्ह आले.

आईव्हरमॅक्टीन रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी असलेलं एंटीव्हायरल औषध आहे. या औषधांचा परिणाम दिसून येण्यासाठी मोठया प्रमाणात चाचणी करण्याची आवश्य़कता आहे. पण कोणत्याही साईट इफेक्ट नसलेल्या या औषधाने कोरोनाच्या माहामारीत आशेचा किरण दाखवला आहे.

हावर्ड यांनी आपल्या अभ्यासातून सांगितले की कोरोना रुग्ण या औषधाने बरे होत आहेत. कानपूरमध्ये मेडिकल कॉलेजमधील १०४ रुग्णांना हे औषधं देण्यात आलं होतं. ९४ लोकांचे टेस्ट ४ दिवसात निगेटिव्ह आले कानपूरमध्ये या रिसर्चवर रिपोर्ट प्रकाशित करण्यात येणार आहे.