CoronaVirus : धोका वाढला! भारतात झपाट्यानं होतोय कोरोना विषाणूंचा उद्रेक; तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 07:52 PM2020-09-04T19:52:17+5:302020-09-04T21:25:28+5:30

भारतात कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिका आणि ब्राजिलनंतर भारतात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार मागील एका आठवड्यात ५ लाख कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं 'ग्लोबल टॅली' मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आणि पूर्व आशियात सगळ्यात जास्त केसेसे दिसून आल्या आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ७ दिवसात जवळपास ५ लाख केसेस दिसून आल्या आहेत. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत संक्रमितांची संख्या जास्त आहे.

मागच्या आठवड्याच्या तुलनेत जगभरात कोविड १९ मुळे मृत्यू होत असलेल्यांच्या संख्येत ३ टक्के कपात झाली आहे. UN आरोग्य संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगभरात १८ लाख नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

हा जीवघेणा व्हायरस अमेरिकेत झपाट्यानं पसरत आहे. संपूर्ण जगभरात संक्रमण होऊन मृत्यू होत असलेल्या संख्या संक्रमित रुग्णांच्या तुलनेत अर्धी आहे. WHO नं दिलेल्या माहितीनुसार मॅक्सिको, कोलंबिया आणिअर्जेंटीना या भागात कोरोनाचा कहर जास्त पाहायला मिळत आहे.

कार्डीओलॉजी स्पेशलिस्ट डॉ. मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना आता शहरांमध्येच नाही तर ग्रामीण भागातही वेगानं पसरत आहे. तरीसुद्धा सरकरानं लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे.

सांस्कृतिक, मनोरंजन, स्पोर्ट्स ईवेंट्ससाठी मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून एका जागी जमा होण्यास मंजूरी मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

याच आठवड्यात कोरोनावरील लसींना घाईघाईत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता.